⭕️ *संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न* ⭕️ 1) थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ? 1) कृतिवाचक धातू 2) अकर्मक धातू 3) उभयविध क्रियापदे 4) सकर्मक क्रियापदे उत्तर :- 2 2) खालील वाक्य हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे. ‘ती काय माती गाते !’ …
अमळनेर शहरात दोन ठिकाणी आढळले साप, पकडताना सर्प मित्राला केला दंश
विषारी नसल्याने टळला धोका, दुर्मिळ जातीचा नाणेटी आणि दिवड जातीचा साप अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळा सुरू झाल्याने बिळात पाणी जात असल्याने विविध जीव जंतू बाहेर पडत आहे. त्यात साप ही बाहेर पडले आहे. त्यात शनिवारी ज्ञानेश्वर कॉलनी आणि नाट्यगृह परिसरात आढळले साप सर्प मित्र कृष्णा पाटील आणि अविनाश परमार यांनी पकडले. …
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे पालक -शिक्षक सभेतून साधला संवाद
अमळनेर (प्रतिनिधी) पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद व्हावा या उद्देशाने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत बन्सीलाल पॅलेस येथे पालक- शिक्षक सभा शनिवारी झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे उपस्थित होते. तसेच उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर ,शालेय समितीच्या सदस्या शितिका अग्रवाल व आचल अग्रवाल उपस्थित होते. सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची …
मंत्री अनिल पाटील यांच्या स्वागताला विद्यार्थ्यांना उपाशीपोटी उन्हात केले उभे
शोषण व आरटीई कायद्याचे उल्लंघन झाल्याचा विरोधकांकडून आरोप अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री अनिल पाटील शहरात प्रथमच आल्यावर त्यांच्या स्वागतासाठी शहराबाहेरील ताडेपुरा भागातील निवासी आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हात उपाशी उभे करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शोषण व आरटीई कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. शासनानेच मंत्री अथवा व्हीआयपी …
मंत्री अनिल पाटलांच्या वाढदिवसाला दिव्यांग बांधवाना विविध साहित्य वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर,कुबड्या व कर्णयंत्र आदी साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत वाढदिवसाचे निमित्त साधून सुरवातीला दहा दिव्यांग बांधवाना हस्ते हे साहित्य ना अनिल पाटील यांच्या हस्ते वाटप …
आदिवासी आश्रम शाळेच्या प्रकाराशी मंत्री म्हणून माझा काहीही संबंध नाही : ना. अनिल पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांबाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी मंत्री म्हणून माझा काहीही संबंध नाही, त्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती,हेतुपुरस्कर तसा प्रकार कुणी केला असेल तर मुळीच सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. त्यांनी त्यांच्या ट्विटर वर ट्विट करून आपला खुलासा केला …
अखेर न्यू प्लॉट परिसरात भुयारी गटारीचे खोदकाम व्यवस्थित बुजवण्यास सुरुवात
न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या तक्रारीची दखल घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान अमळनेर (प्रतिनिधी) पाहिल्याच पावसात शहरातील न्यू प्लॉट भागात भुयारी गटारीमुळे खोदलेले रस्ते खचू लागल्याने चिखल झाला होता. त्यामुळे नागरिकांची अडचण लक्षात घेऊन न्यू प्लॉट परिसर विकास मंचने आवाज उठविताच याची दखल घेऊन खोदकाम व्यवस्थित बुजविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी …
नगरपरिषद संचालनालयाचे संचालक किरण कुलकर्णी यांनी अमळनेर पालिकेस भेट देऊन घेतला कामाचा आढावा
डीएमएकडे अमळनेर नगरपरिषदचे बाकी 7 कोटीची केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाचे संचालक किरण कुळकर्णी यांनी दि 8 जुलै रोजी अमळनेर नगरपरिषदेत धावती भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव यांनी कुलकर्णी यांचा शाल, व बुके देऊन सत्कार केला. …
साहित्य संमेलनात खान्देशातील ३० टक्के साहित्यिकांना संधी देण्यासाठी प्रयत्न करू
म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी व्यक्त केला विश्वास अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात खान्देशातील ३० टक्के साहित्यिकांना संधी दिली जाईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले. अमळनेर येथे दिनांक २ ते ४ फेब्रुवारी …
स्टोन क्रशरवरील मजुरांच्या घरात चोरट्यांचा डल्ला, ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबवला
अमळनेर (प्रतिनिधी) मजुराच्या घरातून चोरटय़ाने सोन्याचांदीच्या दागिन्यासह ६२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना देवळी शिवारात नवकार स्टोन क्रशर जवळ रात्री घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय जयसिंग यादव हा देवळी परिसरातील नवकार स्टोन क्रशर वर मजुरीचे काम करतो. ७ रोजी त्याने आपल्या पत्र्याच्या शेड वजा झोपडीला …