❇️चालू घडामोडी ❇️ ◆ जी किशन रेड्डी यांनी व्हिझिट इंडिया इअर 2023 उपक्रम सुरू केला. ◆ 2023 साठी भारताचा हज कोटा 1,75,025 निश्चित करण्यात आला. ◆ नागालँड सरकारने पाम तेलाच्या लागवडीसाठी पतंजली फूड्ससोबत सामंजस्य करार केला. ◆ Mobicule द्वारे बँका आणि NBFCs साठी मालमत्ता परत मिळवण्याचे मॉड्यूल लाँच केले आहे. …
ग स पतपेढीतर्फे कन्यादान योजना अंतर्गत पाच हजार रुपयांचा धनादेश केला प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) ग स पतपेढीतर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजना अंतर्गत पंचायत समितीतील शिक्षण विभागातील महिला कर्मचारीच्या मुलीला पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. अमळनेर येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कर्मचारी सुलोचनाताई पाटील यांच्या कन्या जान्हवी हिचा विवाह जानवे (ता अमळनेर) येथील मुरलीधर पाटील यांचे चिरंजीव शुभम याच्याशी झाला. या …
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीसाठी देण्यात आली मुदतवाढ
अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदार यादीसाठी अहर्ता दिनांक वाढवण्यात आली आहे. नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती आणि विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सदस्यांचा मतदार याद्यांमध्ये समावेश करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. नागपूर खंडपीठाने ३० एप्रिल पर्यंत बाजार समित्या निवडणूका घेण्याचे निर्देश दिल्याने प्रक्रियेला पुन्हा वेग आला आहे. …
बाला उपक्रम जि.प.शाळांना नवसंजीवन ठरेल : आमदार अनिल पाटील
पिंगळवाडे येथे बाला उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा उत्साहात अमळनेर (प्रतिनिधी) डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट लवकर शिकता येते, त्यामुळे बाला उपक्रम जि.प.शाळांना नवसंजीवन ठरेल, असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी केले. पिंगळवाडे येथे बाला उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा उत्साहात झाली. यावेळी आमदार पाटील बोलत होते. जिल्हा परिषद जळगाव चा अभिनव “बाला” या …
श्री वरणेश्वर महादेव मंदिर परिसरात बसवण्यात येणार्या घंटाची 18 रोजी मिरवणूक
अमळनेर (प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त श्री वरणेश्वर महादेव मंदिर परिसरात घंटा बसवण्यात येणार असून या घंटाची 18 रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री वरणेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असते. एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या देवस्थानात सर्व शिवभक्तांनी वर्गणी करून 103 किलोची एक घंटा, 21 किलोची एक घंटा …
संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशनतर्फे १७ फेब्रुवारी रोजी होणार रोजगार मेळावा
अमळनेर(प्रतिनिधी) येथील संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव निमित्ताने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर येथील राजमुद्रा फाऊंडेशनतर्फे शिवजयंती निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवजन्मोत्सव २०२३ निमिताने संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी , शुक्रवार …
जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद येथे ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, आमदार अनिल पाटलांनी भरीव विकासकामे दिली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सत्कार केला. यावेळी सरपंच भारती शशिकांत साळुंखे, शशिकांत साळुंखे, संभाजी देशमुख, हरीश कोळी ज्ञानेश्वर चौधरी, दीपक साळुंखे, कल्पेश …
आमदार अनिल पाटील यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर विधानसभा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती
अमळनेरात विद्यार्थी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधीनी फटाके फोडून केले स्वागत अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर ( सिनेट सदस्यपदी ) महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्तीबद्दल विद्यार्थी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींनी अमळनेरात फटाके फोडून स्वागत केले. सदर नियुक्ती बद्दल महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे …
मारवड पोलिसांनी मांडळ येथे छापा टाकून गावठी दारूची हातभट्टी केली उध्वस्त
अमळनेर (प्रतिनिधी) मारवड पोलिसांनी तालुक्यातील मांडळ येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकत उध्वस्त करून कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील मांडळ गावालगत पांझरा नदीकाठी गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याची माहिती सपोनि. जयेश खलाने यांना मिळाली,त्यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ भरत श्रीराम ईशी, …
कळमसरेत ऊस तोड करणाऱ्या बंजारा बांधवांनी सेवालाल महाराज यांना केले अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती तालुक्यातील कळमसरे येथे साजरी करण्यात आली. ऊस तोड करणाऱ्या बंजारा समाज बांधवानी प्रतिमा पूजनाच करून अभिवादन केले. दिनांक 15 जानेवारी रोजी बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने चाळीसगाव तालुक्यातील कृष्णपुरी येथील शेतात मुक्कामाला असलेल्या ऊस तोड बंजारा …