९६ हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरून चोरट्यांचा वीज कंपनीला जोरदार झटका

नगाव शिवारात तब्बल सात शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या उच्चदाब वाहिनीवरून चोरी अमळनेर (प्रतिनिधी) तब्बल सात शेतकऱ्यांच्या शेतातून जाणाऱ्या उच्च दाब वहिनीच्या अल्युमिनियमच्या ८ गाळ्यांमधील सुमारे ९६ हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरांनी चोरून नेल्याची घटना १९ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नगाव शिवारात उघडकीस आली. यामुळेच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेली …

जीएस हायस्कूल येथे श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) खाशि मंडळाच्या जी एस हायस्कूल येथे “श्रीकृष्ण जयंती उत्सव” उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोहनिश राजपूत हा कृष्णाच्या रुपात सजला होता त्याची सजावट शाळेतील शिक्षक अमित पाटील यांनी केली. तो सर्वांचा आकर्षणाचा विषय ठरला. त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दहीहंडीचे होते. उपस्थितांच्या उत्साह शिगेला …

सरस्वती विद्या मंदिर शाळेत श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याचा उत्सव साजरा

मुलं व मुलींनीही ३ थर मानवी मनोरे बनवून हंडी फोडत लुटला आनंद अमळनेर (प्रतिनिधी) आला रे आला गोविंदाच्या जोषात येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. तर विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनीही जल्लोषात दहीहंडी फोडली. बाळगोपालांच्या आणि कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🟠भारतीय बॉक्सर अमित पंघलने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये 48-51 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. 🔹त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा 5-0 ने पराभव केला. कोव्हिड, लॉकडाऊन अन् मधल्या काळातला ‘यथावकाश’पणा आता मागे पडला आहे. निराशेचं मळभ दूर होऊन मनामनात आशा प्रज्वलित करणारा हा काळ आहे. आता आपण मागे पडून चालणार नाही! आपलं नाणं आता खणखणीत वाजलं …

“ओम नमो शिवाय’ व ‘जय भोले” च्या गजरात चंद्रेश्वर महादेव मंदिर यात्रा उत्साहात

शिवसेना शाखा, शिवाजीनगर शिरुड नाका, जयहिंद व्यायाम शाळा व राजे शिवाजी मित्र मंडळातर्फे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील भाविकांची चांदवड जिल्हा नाशिक येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर यात्रा “ओम नमो शिवाय’ व ‘जय भोले” च्या गजरात उत्साहात पार पडली. यात सुमारे २५० भाविक सहभागी झाले होते. अमळनेरातील शिवसेना शाखा, शिवाजीनगर शिरुड …

गांधली-पिळोदे बालाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर

विप्रो कंझुमर केअर आणि आधार बहुद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) येथील विप्रो कंझुमर केअर आणि आधार बहुद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गांधली-पिळोदे बालाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन विप्रोचे जनरल मॅनेजर विजय बागजीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विप्रोचे मिलिंद मरकंडे …

राजस्थान येथील ९ वर्षीयमागासवर्गीय चिमुरड्याच्या हत्येस जबाबदार शिक्षकास जाहीर फाशी द्या

अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी अमळनेर (प्रतिनिधी) राजस्थान येथील इंद्र कुमार मेघवाल या मागासवर्गीय ९ वर्षीय चिमुरड्याच्या हत्येस जबाबदार असलेल्या जातीयवादी व्यवस्थेस खतपाणी घालणाऱ्या शिक्षकास जाहीर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अमळनेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकारी …

शिवसेनेचे अमळनेर शहर प्रमुख संजय पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी दिला पदांचा राजीनामा

राजीनामा दिला असला तरी आम्ही शिवसेनेतच असून शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार असल्याचे केले स्पष्ट अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेचे अमळनेर शहर प्रमुख संजय कौतिक पाटील आणि तालुका संघटक महेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसेच देशमुख यांनी शेतकी संघाच्या प्रशासकीय सदस्य पदाचाही राजीनामा शेतकी …

अपघात टाळण्यासाठी ताडेपुरा परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी

भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांच्यासह नागरिकांनी बांधकाम विभागाला दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) अपघात टाळण्यासाठी ताडेपुरा परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांनी दिले अमळनेर बांधकाम विभागाकडे केली आहे. कंखरे यांनी अमळनेर बांधकाम विभागाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य महामार्ग 6 हा शहरातील ताडेपुरा परिसरातुन जात असल्याने हा …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: ❇️ जीव विज्ञान की कुछ महत्वपूर्ण शाखाएँ ▪️ एपीकल्चर (Apiculture) – मधुमक्खी पालन का अध्ययन ▪️ सेरीकल्वर (Sericulture) – रेशम कीट पालन का अध्ययन ▪️ पीसीकल्चर (Pisciculture) – मत्स्य पालन का अध्ययन ▪️ माइकोलॉजी (Mycology) – कवकों का अध्ययन ▪️ फाइकोलॉजी (Phycology) – शैवालों का अध्ययन ▪️ पोमोलॉजी (Pomology) …