अमळनेर (प्रतिनिधी ) येथील लायन्स क्लब व नायरा क्लिनिकने घेतलेल्या मोफत त्वचारोग शिबिरात १४४ जणांनी लाभ घेतला. शिबिरात जळगाव येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. स्वप्नील पाटील यांनी १४४ पुरुष,महिला व मुलींची तपासणी केली. लायन्सचे प्रेसिडेंट विनोद अग्रवाल सेक्रेटरी योगेश मुंदडा, ट्रेझरर प्रसन्ना जैन,प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, शेखर धनगर, जितेंद्र जैन, प्रदीप …
गाडीला भगवा ध्वज लावून गुरे चोरून कत्तलीसाठी नेणाऱ्या धुळ्याच्या दोघा फरार संशयितांना केली अटक
अमळनेर (प्रतिनिधी ) गाडीला भगवा ध्वज लावून तालुक्यातील पाच ठिकाणी गुरे चोरून कत्तलीसाठी नेणारा धुळ्याचा फरार आरोपी अट्टल गुन्हेगार रोशन सोनवणेसह शशिकांत मोरे यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्यातून गुरे चोरून त्यांना धुळे , मालेगाव येथे कत्तलीसाठी …
वाळू चोरीचे खेकड्यांवर फेकले जाळे, म्हणून खरे बडे मासे राहिले रामानिराळे!
पथकाने सात टेम्पो व नऊ बैलगाड्या अवैध वाळू वाहतूक करताना पकडल्या बोरी नदी पात्रात महसूल , पोलीस आणि आर.टी.ओ. विभागाची संयुक्त कारवाई अमळनेर (प्रतिनिधी ) बोरी नदी पात्रात महसूल , पोलीस व आर.टी.ओ. विभागाच्या संयुक्त पथकाने १५ रोजी पहाटे वाळू चोरांवर छापा टाकून सात टेम्पो व नऊ बैलगाड्या अवैध वाळू …
अमळनेर मार्गाच्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करून एक्स्प्रेस गाड्यांचे लोकल टिकट द्या
अमळनेर शहर एआयएमआयएमच्या वतीने रेल्वे प्रशासनाला देण्यात आले निवेदन अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर मार्गाने जाणार्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करून एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा ही तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी अमळनेर शहर एआयएमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात लेखी निवेदन रेल्वे स्टेशन मास्तर यांच्या मार्फत पश्चिम रेल्वेचे …
शहरातील केशवनगरमध्ये भरदिवसा घरफोडी, पाच लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबवले
अमळनेर (प्रतिनिधी ) भरदिवसा घरफोडी करून पाच लाख ६५ हजार रुपयांचे सुमारे १३ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी दीड ते साडे तीन वाजेदरम्यान शहरातील केशवनगर मध्ये घडली. याप्रकरणी पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर शहरातील केशवनगर मधील ज्ञानेश्वर वसंत …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
♦️काही कवी,साहित्यिक व त्यांची टोपणनावें♦️ १) कृष्णाजी केशव दामले:- केशवसुत २) राम गणेश गडकरी:- गोविंदाग्रज, बाळकराम ३) वि. वा.शिरवाडकर :- कुसुमाग्रज ४) त्र्यंबक बापुजी ठोंबरे :- बालकवी ५) शंकर केशव कानेटकर :- गिरीश ६) प्रल्हाद केशव अत्रे:- केशव कुमार ७) आत्माराव रावजी देशपांडे :- अनिल ८) दिनकर गंगाधर मोडक:- अज्ञातवासी …