स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

मूलभूत अधिकाराचा विकास जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन 1215 मध्य ब्रिटेन इथे चर्च चे अधिकार सामान्य लोकांनी मागितले ज्याला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. इथूनच मूलभूत अधिकारांचे विकास मानले जाते. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये समता (Equality) स्वातंत्र्य (Freedom) बंधुत्व यांचा विकास झाला. 1931 मध्ये कराचीमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभ भाई पटेल …

युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी अमळनेर येथील तरुणासह दोघांवर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर एकनाथ पाटील या युनियन बँकेतील शिपायाने ५ जून रोजी त्याच्या राहत्या घरी पंख्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी कडीस नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी सकाळी ९ …

धार येथे शेतीच्या वाटा हिश्श्यावरून भाऊ एकमेकाच्या उठले जिवावर

अमळनेर (प्रतिनिधी) शेतीच्या वाटा हिश्श्यावरून भाऊ हे एकमेकाच्या जिवावर उठल्याची घटना तालुक्यातील धार येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी दोन्ही गटातर्फे मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धार येथील दिलीप शेंनपडू पाटील याने फिर्याद दिली की २१ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शेतात …

जानवे येथे फिरते न्यायालयात फौजदारी स्वरूपाच्या २६ व दिवाणी स्वरूपाचा एक दावा निकाली

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथे झालेल्या फिरते न्यायालयात फौजदारी स्वरूपाच्या २६ व दिवाणी स्वरूपाचा एक दावा निकाली काढण्यात आला. विधी सेवा प्राधिकरण मुंबई व अंतर्गत विधी सेवा समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या फिरत्या न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालय परिसरात सकाळी फिरत्या न्यायालयाच्या वाहनाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही आर …

चोरटय़ाने पातोंडा येथील माहिजी देवी मंदिरातील २२ किलोचा पितळी घंटा चोरला

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील माहिजी देवी मंदिरातील २२ किलोचा पितळी घंटा चोरीला गेल्याची घटना २२ रोजीच्या मध्यरात्री घडली पातोंडा मठगव्हान रस्त्यावर वसलेल्या पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान व गावाचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र श्री माहिजी देवी मंदिर देवस्थान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्याच वर्षी भाविकांनी मंदिराला अंदाजित २२ किलो असलेला पितळी घंटा भेट …

शहरातील सुभाष चौक परिसरातील सोमेश्वर शॉपिंग कॉम्प्लेक्समधून दुचाकीची चोरी

अमळनेर (प्रतिनिधी)भर दुपारी दुचाकी चोरी झाल्याची घटना शहरातील सुभाष चौक परिसरातील सोमेश्वर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये २१ रोजी घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील सुभाष चौक परिसरातील सोमेश्वर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये २१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भारतकुमार मोटूमल पंजाबी यांची ४५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल (क्रमांक एम एच …

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आज अमळनेर येथे साधणार संवाद

अमळनेर (प्रतिनिधी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आज २३ जून रोजी अमळनेर दौर्‍यावर येत आहेत. गलवाडे रोड वरील अंबिका मंगल कार्यालयात आज सायंकाळी ७-०० वाजता ते जळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आजी – माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी संघटना बांधणी बाबत चर्चा व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. …

गाधंली पिळोदा येथील शिबिरात ४५ वर्षावरील २३५ नागरिकांना दिली लस

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गाधंली पिळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीष गोसावी यांचा उपस्थितीत कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी ४५ वर्षावरील २३५ नागरिकांना लस देण्यात आली. भारतीबाई प्रकाश पाटील सरपंच यानी पहीली लस घेतली. मा .तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनखाली डॉ. कमलेश भावसार विविध …

न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे दिले धडे

अमळनेर (प्रतिनिधी) न्यु व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे धडे देण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून योगाचे महत्व पटवून दिले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका योगिनी ओवे, रितिका मार्कंडेय, वंदना मराठे, कविता शिसोदे, विद्या पाटील, कामिनी महाजन, स्नेहा …

तरुणाने बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन केली आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी)जेडीसीसी बँक कॉलॉनीतील तरुणाने बाभळाच्या झाडाला सुती दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे करण उशिरापर्यंत समजले नाही. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील जेडीसीसी बँक कॉलॉनीतील रहिवासी संदीप अंकुश भिल (वय २५) या तरुणाने डॉ. बहुगुणे यांच्या गट नंबर १५७५/३ मधील प्लॉटिंग भागात बाभळाच्या …