नगरपालिकेत अमळनेकरांना वेडे बववून पेढे खाण्याचा प्रकार अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेचे कनिष्ठ लिपिक संजय चौधरी यांचा भंडार विभागाशी काहीही संबंध नसताना त्यांनी सुमारे १ कोटी रुपयांची भंडार सामुग्री स्वतःच्या सहीने नमुद केलेली आहे. तर ही भंडार सामुग्री कोणासही वितरित केली गेलेली नाही. त्यामुळे ती गेली कुठे, हा संशोधनाचा विषय असूनही पदस्थापना …
अमळनेर तालुक्यात आता रविवारी जनता कर्फ्यू, सोमवारी नो व्हेइकल डे
प्रदुषण निर्मुलन आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आले निर्णय अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सोमवार ऐवजी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तर प्रदूषण रोखण्यासाठी सोमवारी नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रातांधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत दर रविवारी अमळनेर तालुक्यात जनता कर्फ्यु पाळण्याचा …
गांजाच्या नशा धुंदीचे कनेक्शन थेट अमळनेर व्हाया पारोळा, कल्याण
पारोळा पाठोपाठ अमळनेर येथून एकाला केली अटक अमळनेर (प्रतिनिधी) कल्याण येथील पोलिसांनी गांजा सप्लायप्रकरणी पारोळा येथील एका पुरुषासोबत महिलेला ताब्यात घेतल्यानंतर अमळनेर येथून एकासही ताब्यात घेतले आहे. हा गांजा पुरवठा अमळनेर येथून होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कल्याण पोलिसांनी अशोक कंजर यास ताब्यात घेतले आहे. कल्याण पश्चिममध्ये …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
???????? दिनविशेष ???????? #DinVishesh ???? १२ डिसेंबर – घटना ???? १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन. १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे. १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले. १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या …
शेतकऱ्यांचा कापूस व मका खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करावे
भाजपा पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली मागणी अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शेतकर्यांचा कापूस आणि मका खरेदीसाठी केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातअमळनेर तहसीलदारांना भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, पराग पाटील व ॲड .व्ही. आर. पाटील यांनी निवेदन दिले.
व्हर्च्यूअल रॅलीतून शरद पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली उर्जा
प्रतिनिधी (अमळनेर)- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदरा शरद पवार यांनी शनिवारी वाढदिवासनिमित्ताने डिजिटल व्हर्च्यूअल रॅलीतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून काम आणि संघटन मजबूत करण्यासाठी एक नवी उर्जा दिली. अमळनेर येथे आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात जी.एस. हायस्कुलमधील आयएमए हॉल येथे आयोजन करण्यात आले. सुरवातीला जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, …
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करून शिवेसनेने काढला मोर्चा
तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन व्यक्त केल्या भावना अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेले पेट्रोल, डिझेलचे भाव आणि माहागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याचा शिवसेनेतर्फे निषेध करून मोर्चा काढण्यात आला. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख संजय पाटील, महिला …
सानेगुरुजी पतपेढीच्या नोकरी भरतीला जैसे थेचे दिले आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या नोकर भरतीला सहकार न्यायालयाच्या न्या. आर. एस. शेख यांनी १७ डिसेंबरपर्यंत जैसे थे चे आदेश दिल्याने भरती प्रक्रिया थांबली आहे. यामुळे आता १७ रोजीच्या सुनाणीकडे लक्ष लागून आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक रामकृष्ण पाटील हे अमळनेर सानेगुरुजी पतपेढीत कर्मचारी …
ग्रामीण भागातील मुलीही स्पर्धा परीक्षेतून घेणार फिनिक्स भरारी
आयजी दिघावकर मंगरुळला मुलींचे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारणार पीक विमा मंजूर असूनही मिळत नसल्याची शेतकऱ्यांनी केली तक्रार अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील मुलींनाही स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावे, यातून त्यांनीही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी मंगरूळ येथे मुलींचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि संगणक प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. …