अमळनेर (प्रतिनिधी) दिवाळीसाठी महिला माहेरी गेल्याची संधी साधत चोरट्यांने घराचा कडी कोंडा तोडून ४० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १५ ते १७ रोजी पिंपळे रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील पिंपळे रोडवर राहणार्या मनीषा भूषण पाटील या १५ पासून दिवाळीसाठी …
लघुशंकेसाठी गेलेल्या एकाला चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण
अमळनेर(प्रतिनिधी) लघुशंकेसाठी गेलेल्या एकाला चौघांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता भारत सायकल मार्ट जवळ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल देविदास घोगले हा १६ रोजी रात्री भारत सायकल मार्ट जवळील शौचालयाजवळ लघुशंकेला गेला असताना केसर (पूर्ण नाव …
चोरट्यांनी गांधली रस्त्यावरील शेतातून दोन बैलजोड्या केल्या लंपास, गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी`) गांधली रस्त्यावरील शेतातून दोन बैलजोड्या लंपास केल्याची घटना दि. १७ नोव्हेंबर रोजी गांधली जळोद रस्त्यावरील हॉटेल पांडुरंग समोरील शेतात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांचे पशुधन चोरी होण्याच्या घटना वाढल्या असून यामुळे शेतकरी बांधवाना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शहरातील सानेनगर येथिल …
सुदंरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी शिवधनुष्य घेतले हाती
शिवसेना उपनेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश अमळनेर(प्रतिनिधी) गावाच्या विकासासाठी शिवधनुष्य हाती घेत तालुक्यांतील आदर्श गाव सुदंरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी गावाचा विकास हाच ध्यास घेतल्याने अनेक वर्षे सरपंचपद भूषवले आहे. म्हणून पुन्हा कामाला गती देण्यासाठी त्यांनी शिवधनुष्य हाती पेलले आहे. …
नगरपालिकेच्या निवृत्त शिक्षकांनी पेन्शनची आमदार अनिल पाटलांपुढे मांडली व्यथा
अमळनेर (प्रतिनीधी) जुलैपासून पेन्शन नसल्याने ज्येष्ठ शिक्षक हवालदिल झाले असून ते त्वरित मिळावे, या मागणीसाठी अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वंचित पेन्शन धारक शिक्षकांनी आमदार अनिल यांची भेट घेऊन गार्हाणी मंडळी. तर त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. गेल्या पाच महिन्यापासून आम्ही वेतनाविना असताना आमच्याकडे कुणी लक्ष द्यायला …
ज्वारीला २६२० तर मकाला १८५०, बाजरीला २१५० चा हमीभाव जाहीर
शेतकी संघाच्या आवारात शासकीय भरड धान्य खरेदीस सुरुवात, अमळनेर(प्रतिनिधी)ज्वारीला २६२० तर मकाला १८५०, बाजरीला २१५० चा हमीभाव जाहीर करण्यात आला असून मंगळवारी धुळे रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीनमध्ये शासकीय शासकीय भरड धान्य केंद्र शुभारंभ करण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. काटापूजन करून ज्वारी मका बाजरी …
ग्रामीण भागात आढळला एक रुग्ण पॉझिटिव्ह, नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. मंगळवारी आलेल्या अहवालातही १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच …