अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाहआलमनगर येथे ईद- ए- मिलाद निमित्ताने एआयएम आय एमतर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुस्लिम समाजाचे अनेक मान्यवरांनी भेट देऊन उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जैतपीर माध्यमिक विद्यालयात वाचनालयाचे थाटात उदघाटन
प्रवीण महाजन यांनी दिली शाळेला ११० पुस्तके भेट अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीर येथील के.पी.सोनार माध्यमिक विद्यालयात वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेचे प्रमुख प्रवीण महाजन यांनी शाळेला ११० पुस्तके भेट दिले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती, राष्ट्रीय एकता दिन, महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वाचनालयाचे उद्घाटन …
खेडी व्यवहारदळे येथे उत्तरकार्याचा शिळा भात खाने पडले महागात
तब्बल २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे उत्तरकार्याचा शिळा भात खाल्याने तब्बल २२ जणांना विषबाधा झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली. यामुळे ग्रामस्थांसह आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्याचा कार्यक्रम होता. …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
❇️ आत्तापर्यंत राज्यसभेवर नियुक्त झालेले सरन्यायाधीश: 1. न्या. बहरुल इस्लाम 2. न्या. रंगनाथ मिश्रा 3. न्या. रंजन गोगोई ♦️ न्या. बहरुल इस्लाम : ????बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती. ????बहरुल इस्लाम हे 1956 …