महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला मिळवून दिला सन्मान : माजी आमदार साहेबराव पाटील

अमळनेर नगरपरिषदेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन अमळनेर(प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला सन्मान मिळवून दिला असून त्यांचे विचार आणि काम आजही प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केले. अमळनेर नगरपरिषदेतर्फे शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

???? महात्मा गांधी ची 151 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ???? ????पूर्ण नाव : मोहनदास करमचंद गांधी. ???? आईचे नाव : पुतळाबाई ????पत्नीचे नाव : कस्तुरबा गाधी ✔️ जन्म : 2 ऑक्टोबर 1869, पोरबंदर (गुजरात) ✔️ निधन : 30 जानेवारी 1948, दिल्ली. ???? २ ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ …

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे “प्लास्टिक मुक्त भारत अभियान”

माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी)भाजयुमोतर्फे  शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त “प्लास्टिक मुक्त भारत अभियान” राबवून नागरिकांना कापडी पिशव्या आणि मास्क वाटप करण्यात आले. भाजपा कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. नंतर त्याचाच …

अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी अमळनेर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करून तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात २०२० ते …

कंडारी येथे शाळेचे संरक्षण भिंती, रस्ता, पेव्हर ब्लॉक भुयारी गटारी कामांचे भूमिपूजन

आमदार पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील कंडारी येथे शाळेचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, रस्ता, पेव्हर ब्लॉक बसविणे, भुयारी गटारी आदी विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कंडारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, १४ व्या वित्त आयोगातून रस्ता, पेव्हर ब्लॉक बसविणे यासह …

मंगरूळ येथे कोळशाचा ट्रक दुभाजकावर आदळून उलटला, चालक सुदैवाने बचावला

दुभाजकावर पथदिवे न लावल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून धोका वाढला अमळनेर (प्रतिनिधी) दुभाजकावर पथदिवे न लावल्यामुळे तेथील सळई टायरमध्ये घुसून फुटल्याने कोळशाचा ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आदळून उलटा झाल्याची घटना मंगरूळ येथे २ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने चालक बचावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात येथून बऱ्हाणपूरकडे …

भारतीय कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी प्रसाद शर्मा तर सरचिटणीसपदी सोमचंद संदानशीव यांची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय इंटकशी संलग्न भारतीय कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी प्रसाद शर्मा तर सरचिटणीसपदी सोमचंद संदानशीव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यावेळी इतर कार्यकारिणी ही निवडण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , जिल्हा महिलाध्यक्षा सुलोचना पाटील , …

अमळनेर तालुक्यातील २४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, २० कोरोनामुक्त

अमळनेर (प्रतिनिधी)शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी आलेल्या अहवालात २४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत ९७ जणांचा बळी गेला आहे. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४२०५ वर पोहोचली आहे. अमळनेर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुन्हा शुक्रवारी दिलासा मिळाला. तर शुक्रवारी आलेल्या …