स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

■◆■ दिनविशेष ■◆■ जागतिक निसर्ग दिन – 3 ऑक्टोबर. ◆◆संरक्षण◆◆ 01 ऑक्टोबर 2020 पासून नवे अतिरिक्त महासंचालक (सैन्य परिचारी सेवा) – मेजर जनरल सोनाली घोसाळ. भारतीय भुदलासाठी “आर्मी स्टॅटीक स्विच्ड कम्युनिकेशन नेटवर्क (ASCON)” या दूरसंवाद प्रणालीच्या चौथ्या टप्प्याचे काम करणारी कंपनी – ITI लिमिटेड. 01 ऑक्टोबर 2020 पासून नवे प्रभारी हवाई अधिकारी, वायु भवन, भारतीय …

कुऱ्हे खुर्द येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला शासकीय मदतीने दिली ‘उभारी’

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी कुटुंबाची भेट घेऊन दिला धनादेश अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या उभारी कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील कुऱ्हे खुर्द येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच इतर शासकीय योजना देण्यासंदर्भात माहिती घेण्यात घेण्यात आली. अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे खुर्द येथील शेतकरी भीमराव सुपडू …

आमदार अनिल पाटील यांच्याकडे खेडीढोक ग्रामस्थांनी मांडल्या मागण्या  

ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आमदार पाटील यांनी दिले आश्वासन अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या तालुका पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथील नागरिक पिढ्या न पिढ्यापासून अनेक समस्यांचा सामना करीत आहे. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमदार आनिल पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. त्यांच्या मागण्या ऐकून घेत आमदार पाटील …

जळोद येथे भोई समाज मंदिर, व्यायाम शाळा, रस्ता काँक्रीटीकरणसह विविध विकासकामांचे लोकार्पण

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद येथे भोई समाज समाज मंदिर, व्यायाम शाळा, रस्ता काँक्रीटीकरणसह विविध विकास कामांचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. जळोद येथील भोई समाज समाज मंदिर, व्यायाम शाळा, रस्ता काँक्रीटीकरण या आधी झालेल्या कामाचे लोकार्पण शिरीष चौधरी …

उत्तर महाराष्ट्र स्तरावरील खुल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत सारांश सोनारने प्रथम येऊन राखले वर्चस्व

धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयातर्फे झाली स्पर्धा अमळनेर(प्रतिनिधी) धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयातर्फे झालेल्या ‘महात्मा गांधींचे आरोग्य व स्वच्छतेबाबत विचार ’या विषयावरील  उत्तर महाराष्ट्र स्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत धुळे विधी महाविद्यालयचा अंतिम वर्षीय विद्यार्थी सारांश सोनार यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत गत वर्षाचे …

गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा आरोपीना सोमवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

आरोपींनी पिस्तुल कोठून आणले? कोणाला देणार होते? याचा पोलिस घेताय शोध अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळलेल्या गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा आरोपीना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्याकडून अधिक माहिती काढता येणार आहे. अमळनेर पोलिसांनी चोपडा येथून गावठी पिस्तुल घेऊन पळ काढलेल्या  राजेश गणेश गुरखा (रा. शिरूड …

दिलासादायक : अमळनेर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरतोय

अमळनेर शहरात केवळ नव्याने ६ रुग्ण आढळले,  ग्रामीण भागात लागला ब्रेक अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील शनिवारी आलेल्या अहवालात केवळ अमळनेर शहरातच ६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे रुग्ण संख्येचा घसरलेला आलेख दिलासा देणारा ठरला आहे. तर  तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४२११ वर पोहोचली आहे. …

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने बोरी नदीची स्वच्छता जोमात

अमळनेर (प्रतिनिधी)  माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने यावर्षी सुध्दा “नदी हमारी माता है,जनम जनम का नाता है” असे म्हणत बोरी नदीच्या स्वच्छतेचे काम जोरात सुरु असल्याचे पाहून अमळनेरकर नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अमळनेर शहरातून बोरी नदी वाहते. महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या …

चोपड्यातून गावठी पिस्तुल घेऊन पळालेल्या दोघांचा सिनेस्टाईल पाठलाग करून अमळनेरात घातली झडप

दोन्ही संशयित आरोपी धुळे येथील रहिवासी, पोलिसांची उत्तम कामगिरी अमळनेर (प्रतिनिधी) चोपड्यातून दुचाकीने गावठी पिस्तुल घेऊन पळ काढलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत अखेर अमळनेर शहरात दोघांवर झडप घालत पोलिसांनी जेरबंद केले. दोन्ही संशयित आरोपी हे धुळे येथील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री …

गांधी जयंतीच्याच दिवशी कलाली येथे  ग्रामसेवकाला मारहाण करून ‘हिंसा’

मोबाईल फोडून खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचीही दिली धमकी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कलाली येथील  ग्रामपंचायत कार्यालयात बसून मोठमोठ्याने मोबाईलवर बोलणार्‍या रोखले असता त्याने  ग्रामसेवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल फोडून खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार गांधी जयंतीच्या दिवशी  सकाळी ११ वाजेला घडला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल …