नफेखोरीची कीड नष्ट करण्यासाठी ‘खबरीलाल’ गोडाऊन करणार एक्स्पोज अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासाठी आतापर्यंत पुरेसा पुरवठा झाला असतानाही दुकानदार नफेखोरीसाठी कृत्रिम टंचाई निर्माण करून जगाचा पोशिंदा बळीराजाच्या डोळ्यात खंतासाठी पाणी आणत आहे. त्यात झोपेचे सोंग घेतलेला कृषी विभाग कानाडोळा करून दुकानदारांनाच ‘खतपाणी’ घालत आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आहे, त्या भावात …
अमळनेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन कोविड योध्दा निस्वार्थ भावाने बजावताय सेवा
मायक्रो बायोलॉजिस्ट श्याम पाटील, एम एससीची विद्यार्थिनी प्रियंका लढानी यांचा कार्याला सलाम अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना काळात अनेक मदतीचे हात पुढे आले तसेच स्वार्थी प्रवृत्तीचा अनुभवही नागरिक घेत आहेत. म्हणून अशा या स्वार्थी प्रवृत्तीतही दिलासा देणारी बाब म्हणजे अमळनेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दोन कोविड योध्दा निस्वार्थ भावाने आपली सेवा बजावत …
राकेश चव्हाण खून प्रकरणातील तीन आरोपींना अटी व शर्तीवर जामीन मंजूर
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील राकेश चव्हाण खून प्रकरणातील तीन आरोपींना अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमळनेर शहरातील ख्वाजानगर बंगाली फाईल येथे दिनांक १०एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ७ : ४० वाजता मुस्लिम समाजातील लोकांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत केली म्हणून त्यांना पहावयाचे असे सांगून राकेश चव्हाण गेला असता जमावाने केलेल्या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
*_आजचे शास्त्रज्ञ_* *_सॅली राईड_* *_पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री_* *_स्मृतिदीन – २३ जुलै २०१२_* *********************** _अंतराळयुगाची म्हणजे ‘स्पेस एज’ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम …
द्रौ.रा.कन्याशाळेचा वर्धापनदिन ७६ वर्षात प्रथमच विद्यार्थिनींच्या अनुपस्थितीत साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील द्रौ.रा.कन्याशाळेचा वर्धापनदिन २३ जुलै रोजी ७६ वर्षात प्रथमच विद्यार्थिनींच्या अनुपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमा पूजन करण्यात येऊन साध्या पद्धतीने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. द्रौ.रा.कन्याशाळेची स्थापना २३ जुलै १९४४ रोजी झाली होती. तालुक्यातील मुलींसाठी प्रथमच स्थापन झालेली स्वतंत्र शाळा आहे. तेव्हापासून दरवर्षी २३ जुलै हा …
खतांची साठेबाजी करणार्यांवर कारवाईसाठी माजी आमदार स्मिता वाघ यांनी घेतला पुढाकार
तहसीलदार आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन कारवाई करण्याची केली मागणी अमळनेर(प्रतिनिधी) पिकांना खात देण्याची वेळ असताना कृत्रिम टंचाई निर्माण करून खतांची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांची वणवण होत असल्याने साठेबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार स्मिता वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार आणि जिल्हा …
कळमसरे येथे दोन शाळा खोल्या, संरक्षण भिंतीसह गावहाळचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
कळमसरे-जळोद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या प्रयत्नाने कामे मंजूर अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे जिल्हा परिषद शाळेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व रोजगार हमी योजना आणि १४ वित्त आयोगाच्या फंडातून मंजूर करण्यात आलेल्या ८ लाख रुपये किमतीच्या दोन शाळा खोल्या, शाळेला संरक्षण भिंतीसाठी २३ लाख व गाव हाळसाठी …
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या टिप्पणीचा केला निषेध
अमळनेर शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे निषेध करत तहसीलदार यांना दिले निवेदन अमळनेर (प्रतिनिधी)भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या टिप्पणीचा अमळनेर शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे …
शहरासह ग्रामीण भागात आणखी ८ रुग्ण आढळले पॉझिटीव्ह, चिंता आणखी वाढली
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह ग्रामीण भागातील आणखी ८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्या ६१२ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अधिकच चिंता वाढली आहे. काल आढळून आलेले सर्व रुग्ण हे नवीन असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य विभाग घेत आहेत. अमळनेर तालुक्यातील रुग्णांच्या आलेल्या अहवालात नवीन ८ पॉझिटिव्ह तर …
अमळनेर शहरासह तालुक्यात पुन्हा १६ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहोचली सहाशेवर
७ नवीन तर ९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने झाले बाधित अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात पुन्हा १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने असून ७ रुग्ण नवीन तर ९ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. तर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने सहाशेचा आकडा पार केला आहे. अमळनेर तालुक्यात बुधवारी आलेल्या अहवालात १६ रुग्ण पॉझिटिव्ह …