अमळनेर (प्रतिनिधी) महिलेला मोबाईलवर संपर्क करून शिवीगाळ केली तसेच जाब विचारण्यासाठी गेल्यावर तिचा विनयभंग केल्याची घटना १७ रोजी रात्री १० वाजता पैलाड भागात फरशी पुलाजवळ दूध डेअरीजवल घडली. प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पैलाड येथील एक २८ वर्षीय महिला पारोळा रोडवर राहते. तिला बबलू धनगर याने मोबाईलवर शिवीगाळ केली. …
प्रताप महाविद्यालयातील कोव्हीड केअर सेंटरमधून ३२ जण झाले कोरोनामुक्त
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनामुक्तीचे पत्र देऊन केले घरी रवाना अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रताप महाविद्यालयातील कोव्हीड केअर सेंटरमधून गुरुवारी सकाळी ३२ जण कोरोनामुक्त केले आहेत. त्यांना कोरोनामुक्तीचे पत्र तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांनी गजानन महाराजांचा पॉकेट फोटो आणि सॅनिटायझर वितरण केले. यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, …
अमळनेरात युरिया खताच्या साठेबाजीला उत, चढ्या भावाने विक्रीकरून शेतकऱ्यांची लूट
कृषी विभागाची डोळेझाक, युरियाची ३०० तर ३५० रुपये दराने सर्रास विक्री अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगाम सुरू झाल्याने अमळनेरातून बाजारातून युरिया गायब करून त्याची साठेबाजी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची लुट करीत युरिया अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करून दुकानदार स्वताचे उखळ पांढरे करून घेत आहे. यामुळे कृषी विभागाने पुरेसा खतसाठा असल्याचा दावा …
धार्मिक भावना दुखावणाऱ्या वृत्तनिवेदकावर कारवाई करा
रियाजोद्दीन रुकनोद्दीन शेख यांनी अमळनेर पोलिसांत दिली तक्रार अमळनेर (प्रतिनिधी) धार्मिक भावना दुखावणाऱ्या न्युज १८ इंडिया निवेदक अमिष देवगण, मुख्य संपादक आणि वृत्त वाहिनीचे कार्यकारी अधिकारी राहूल जोशी यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी अमळनेर येथील रियाजोद्दीन रुकनोद्दीन शेख यांनी केली आहे. संबंधितास शासन व्हावे व …
टेलिफोन खांब्यावर ओढलेल्या वीजतारांमुळे तरुणाला बसला विजेचा जोरदार झटका
वीज कंपनीच्या गलथान कारभाराने आदर्श नगरवासीयांचा जीव धोक्यात अमळनेर (प्रतिनिधी) टेलिफोनच्या खांब्याला हात लागून विजेचा धक्का बसल्याची बाब कोणालाही पटणार नाही. पण विज वितरण कंपनीच्या अवकृपने हा प्रकार शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गुरुवारी घडला आहे. कारण वीजवितरण कंपनीने चक्क टेलिफोनच्या खांब्यावरच वीजतारा टाकल्याने हा चमत्कार घडला. सुदैवाने तरुणाला …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
2019 या वर्षात भारता मध्ये 51 अब्ज डॉलर ची गुंतवणूक. ????सन 2019 मध्ये भारतात 51 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली असून, भारताने जगात नववा क्रमांक गाठला आहे. ????कोरोनाच्या नंतरही भारतीय अर्थव्यवस्था ही वाढती राहण्याचा अंदाज असल्याने गुंतवणूक वाढत राहण्याचा होराही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ????संयुक्त …
सतत कामावर गैरहजर आणि मुकादमला अश्लील शिवीगाळ केल्याने सफाई कामगार निलंबित
मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांची कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव सतत कामावर गैरहजर राहून नेमून दिलेल्या कामात कसुराई केल्याने आणि मुकादमला अश्लील शिवीगाळ करून जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून सफाई कामगार अजय जाधव यास मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी सोमवारी १५ जून पासून विनावेतन निलंबित केले आहे. अमळनेर शहरातील …
अनेक शेतकऱ्यांकडे एटीएम कार्ड नसल्याने पीक कर्जाची काढण्यासाठी उभ्या राहिल्या अडचणी
अमळनेर(प्रतिनिधी) नवीन कर्ज माफी मिळालेल्या शेतकऱ्यांकडे एटीएम कार्ड नसल्याने पीक कर्जाची काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बी- बियाने आणि खते घेता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना त्वरित एटीएम कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शहरातील जिल्हा बँकेच्या कर्ज वाटप शाखेकडून, विकास …
पातोंडा परिसर विकास मंचतर्फे वृक्षारोपण करून राजमाता जिजाऊ भोसले यांना अभिवादन
अमळनेर(प्रतिनिधी) पातोंडा परिसर विकास मंचतर्फे राजमाता, राष्ट्रमाता, आऊ साहेब जिजाऊ भोसले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने बुधवारी प्रतिमा पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. राजमाता, राष्ट्रमाता, आऊ साहेब जिजाऊ भोसले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने पातोंडा परिसर विकास मंच च्या मार्गदर्शनातून जिजाऊ प्रतिमेचे पूजन सरपंच किशोर मोरे यांच्या हस्ते …
कोरोनावर मात करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या निधीतून वैद्यकीय साहित्य दाखल
प्राथमिक केंद्र ढेकू, जानवे, मांडळ, पातोंडा, मारवड यांच्याकडे सोपवण्यात आले साहित्य अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनावर मात करण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निधीतून अमळनेर तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांसाठी लागणारे संरक्षक साहित्य बुधवारी दाखल झाले. हे साहित्य त्यांनी लगेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्याकडे हस्तांतरित केले. आमदार निधीतील पहिल्या टप्प्याचे साहित्य …