अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील तांबेपुरा भागातील सानेनगरातील सार्वजनिक शौचालयांचा मैला बाहेर वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याकडे नगरपालिका सोयिस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने ”खबरीलाल”ने याविषयी वृत्त दिल्याने नगरपालिकेला खळबळून जाग आली. त्यांनी लगेच काम सुरू करून शौचालयाची साफसफाई करून टाकीचे अर्धवट राहिलेले कामही पूर्ण केले आहे. यामुळे या परसरातील नागरिकांनी …
अमळनेर तालुक्यात पहिल्याच पावसाने उडवली दाणादाण
कापूस, ठिबक सिंचन वाहून नुकसान, नदी, नाले तुडूंब वाहिल्याने आबादानी अमळनेर (प्रतिनिधी) शहर व तालुक्यात झालेल्या मान्सूनच्या दमदार पावसाने शेतकरी आणि नागरिकांची दाणादाण केली आहे. त्यात उतारा केलेल्या कापूस, शेतातील ठिबक सिंचन वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले. तर नदी, नाल्यांना पूर आल्याने सर्वत्र आबादानीही झाली आहे. अमळनेर शहरासह तालुक्यात …
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग १४ मध्ये होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रवादी काँगेसच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १४ मध्ये आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील व भटू पाटील यांनी नागरिकांना गोळ्यांचे वाटप केले. या वेळेस नागरिकांना घरातच राहावे विनाकारण बाहेर जाणे टाळावे. तसेच अजून औषधी …
माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रांचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्येशून लिहिलेल्या पत्राचे वाटप माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शहारातील पैलाड, श्रीराम कॉलनी, सानेनगर भागात या पत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी नागरिकांशी सुसंवाद साधत केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या जीएसटी, कश्मीर प्रश्न याबाबत …
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघतर्फे जानवे आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध
मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दोषींवर अजामिनपात्र गुन्हा दाखलची मागणी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघतर्फे निषेध करण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रांत नियमित कामकाज करत असलेले कोरोना योद्धा …
अमळनेरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी इमारतींमध्ये भडकले अग्नितांडव
लाखो रुपयांचे संसार उपयोग साहित्य जळून झाले खाक अमळनेर (प्रतिनिधी) शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन इमारतींना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दिनांक १४ रोजी घडली. यात लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्या जळून खाक झाले आहे. तर दुसऱ्या आगीत चार आणि इमरातीचेही नुकसान झाले आहे. तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे वेळीच …
अमळनेर शहरासह तालुक्यात रविवारी आढळले कोरोनाचे पॉझिटिव्ह “पंचक”
टाऊन हॉलजवळ एक नवीन ३४ वर्षीय पुरुष, तर शहापूर येथे ८२ व ३८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात रविवारी पुन्हा ५ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर २६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच तालुक्यातील रुग्ण संख्या ही २२६ पर्यंत पोहोचली आहे. अमळनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संपर्काबरोबरच नवीन रुग्णही …
मंगरूळ येथे गावाचे सॅनियाझेशनसह होमिओपॅथीच्या गोळ्यांचे केले वाटप
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवसेनेने राबवला उपक्रम अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून संपूर्ण गाव सॅनिटायझेशन केले. तसेच ग्रामस्थाना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्याही वाटप करण्यात आल्या. याबरोबरच नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत जनजागृती करण्यात …
कोरोनाबाधितांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देताय योगाचे धडे
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी कोविड सेंटरच्या उपचाराबाबत दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) शहारात पसरणाऱ्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहे. त्यासाठीच कोविड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्ण लवकर बरे व्हावेत आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून त्यांना नियमित उपचारासह योगा प्रशिक्षणदेखील देण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिली. …
प्राध्यापिकेस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्राध्यापिकेला थांबवून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील प्राध्यापिका जयश्री साळुंखे या १३ रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास विजय बेकरी समोरून जात होत्या. या वेळी बेकरीच्या मालकांनी त्यांना रस्त्यावर थांबवून तुम्ही लुटमारीचे धंदे करतात, या कारणावरून विजय …