अमळनेर वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसह वकिलांनी दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर(प्रतिनिधी) शासनाने इतर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांप्रमाणेच वकिलांनाही कोरोनाकाळता ५० लाखांपर्यंत विमा सुरक्षेचे कवच देण्यात यावे, अशी मागणी अमळनेर वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ वकीलांनी प्रांताधिकाऱ्यांनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रातांधिकारी सीमा अहिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जगभरात …
घरपट्टीसह पाणीपट्टी भरण्यासंदर्भात बिडिओंनी काढला तुघलकी फतवा
कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडल्याने कर भरण्याच्या फतव्याने नागरिकांमध्ये संताप ; सामाजिक कार्यकर्ते सतिश पाटील यांनी वसुली स्थगिती केली मागणी… अमळनेर (प्रतिनिधी ) कोरोनाने शहरासह ग्रामीण अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे. आज लोकांना जीवंत कसे राहता येईल, याची चिंता लागली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शेती कशी करावी, या विवंचनेत शेतकरी असातानाच पंचायत …
अमळनेरकरांनी पोलीस दलातील एक चांगला अधिकारी गमावला
आमदार अनिल पाटील यांनी चांदवड गाठून ससाणेंच्या अपघाताची घेतली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना युद्धात अमळनेरात चांगली सेवा बजावणारे डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी चांदवड रुग्णालयात धाव घेऊन ससाणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी पोलीस दलातील एक चांगला अधिकारी गमावल्याचे दुःख व्यक्त …
साने गुरूजींना अभिवादन करून कोरोनावर मात करण्याचा संकल्प
साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने साने गुरूजींना अभिवादन करून कोरोनावर मात करण्याचा संकल्प करण्यात आला. यानिमित्ताने नितीन भदाणे यांनी सुंदर अशी रांगोळी काढून आम्ही सगळे अमळनेकर एकजूटीने कोरोनाला पळवून लावू संदेश दिला. या वेळी रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस नियमांचे …
डीवायएसपी ससाणेंच्या अपघाताची माहिती मिळताच अधिकाऱ्यांसह डॉक्टर गेले धावून
अमळनेर (प्रतिनिधी) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांच्या अपघाताचे वृत्त कळताच अमळनेर येथील महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी चांदवड येथे धाव घेतली. तसेच ससाणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी दुपारी अमळनेरात धडकताच प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस …
पारोळा येथील नाथजोगी मंडळातर्फे जीवनावश्यक साहित्याचे केले वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा येथील समस्त नाथजोगी समाज मंडळातर्फे श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे सुचित सद्द विचारांनी जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आले. जीवनावश्यक साहित्याचं वाटप प्रसंगी अध्यक्ष जितेंद्रनाथ अशोक नाथजोगी, सचिव संतोषनाथ तुकडूनाथ जोगी, ज्येष्ठ सल्लागार वसंतनाथ झेंडूनाथ जोगी, भिकननाथ चिंधुनाथ जोगी, सभासद ईश्वरनाथ हरीनाथ जोगी, रविंद्रनाथ शंकरनाथ जोगी, किशोरनाथ गोपालनाथ …
गोवर्धन येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून पार पडला आदर्श शुभमंगल विवाह
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गोवर्धन येथे गुरुवारी दि. ११ रोजी आदर्श विवाह सोहळा पार पडला. तालुक्यातील विविध मान्यवरांनी या आदर्श सोहळ्यास भेट देऊन वधू वरांना आशिर्वाद दिले. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित वऱ्हाडींनी सोशल डिस्टन्सिंग पाळले. गोवर्धन येथील रहिवासी व अमळनेर पंचायत समितीचे लिपिक अनिल पाटील यांची कन्या माधुरी व करणखेडा …
न्यायालयाने आठ दुकानदारांचे अर्ज फेटाळ्याने दगडी दरवाजाजवळील वाहतूक कोंडी फुटणार
दुकानदारांचा आजी-माजी आमदारांच्या हस्ते सत्कार, पर्यायी जागाही देणार अमळनेर (प्रतिनिधी) दगडी दरवाज्याजवळ गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमण केलेल्या दुकानदारांचा स्थगिती अर्ज न्यायालयाने गुरुवाळी फेटाळण्यात आला. त्यामुळे दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने शहरातील आजी- माजी आमदारांनी या व्यापाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला. अमळनेर शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजा …