अमळनेरला २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त वर्णेश्वर महादेवाचा यात्रा- उत्सव

उत्सव समिती आणि आर्ट ऑफ लीव्हींग परिवारातर्फे  धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अमळनेर (प्रतिनिधी) उत्सव समिती आणि आर्ट ऑफ लीव्हींग परिवारतर्फे अमळनेर येथील चोपडा रोडवरील पांडवकालीन पुरातन मंदीर श्री वर्णेश्वर महादेव मंदीर येथे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सव आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर …

मुडी येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव, प्रभारी अध्यक्ष व संचालकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

संस्थेचे आजीव सभासद सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) संस्थेच्या घटनेच्या नियमांचा भंग करून तज्ज्ञ संचालक नियुक्त केल्या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मुडी येथील  ग्रामविकास शिक्षण मंडळ संस्थेच्या सचिव, प्रभारी अध्यक्ष व तहहयात संचालकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्या. वाय. जे. वळवी यांनी दिले आहेत, अशी माहिती संस्थेचे आजीव …

प्रताप महाविद्यालयाच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सर्किट डिझाइनिंग, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्सचे घेतले धडे

रुसा या योजनेअंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेत विविध प्रयोगाच्या माध्यमातून केला अभ्यास अमळनेर (प्रतिनिधी) रुसा या योजनेअंतर्गत सर्किट डिझायनिंग व रोबोटिक्स या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा  प्रताप महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स  विभागात  झाली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्किट डिझाइनिंग, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व फिझिक्स विषयाशी निगडित असलेले प्रयोग, इत्यादी  गोष्टींचा प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यास केले. कार्यशाळेची सुरुवात …

संत गजानन महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्ताने पादुका पूजन अध्याय वाचन

संत गजानन महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष  प्रा.आर. बी. पवार यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील मुंदडानगरमधील संत गजानन महाराज मंदिरात १५ फेब्रुवारी रोजी प्रकट दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पादुका पूजन, अध्याय वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी सांगितले. अल्पावधीतच …

विजय नाना पाटील आर्मी स्कूलच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन 

लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे यांच्याशी भेट घेऊन केली समस्यांवर चर्चा  अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी दाखल घेऊन लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. …

अमळगांव येथील आदर्श विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन दिल्या उज्वल करिअरच्या शुभेच्छा 

सुरेश पिरन पाटील यांना “प्रगतीशील किसान पुरस्कार ” मिळाल्याने विशेष सत्कार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथील आदर्श विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन उज्वल करिअरच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गुणगौरव सोहळा झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील उपस्थित होते. …

ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक महिला प्रदेश सचिव रिता भुपेंद्र बाविस्कर यांनी दिली माहिती अमळनेर (प्रतिनिधी) ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले, अशी माहिती ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक महिला प्रदेश सचिव रिता भुपेंद्र बाविस्कर यांनी …

अंगणवाडीत मुलांना चित्रकला साहित्य वाटप करून अस्मिता ग्रुप मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अस्मिता ग्रुपतर्फे  गांधळीपुरा येथील २ अंगणवाडीमध्ये ५५ -६० छोट्या मुलांना चित्रकला साहित्यचे वाटप करण्यात आले. त्यात वेगवेगळे चित्र रंगवण्यासाठीची पुस्तिका आणि रंगपेटी देण्यात आली. यामुळे या मुलांच्या चेहर्‍यावर हसू फुलवले. नवे साहित्य मिळाल्याने ते हरखून गेले. दरवर्षी अस्मिता ग्रुप अमळनेरतर्फे नगरपालिका शाळामध्ये शालेय साहित्य वाटप केले जाते. …

 आपत्ती व्यवस्थापन करण्याचे काम आता ग्रामसेवकांना देखील सोपविणार ; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवरसिंह रावत यांनी कार्यशाळेत दिली माहिती

तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी ; आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न  अमळनेर (प्रतिनिधी) तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी  ग्रामसेवकांनादेखील देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसेवकांना देखील स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवरसिंह रावत यांनी दिली. अमळनेर येथील पंचायत समितीच्या …