मध्यप्रदेश सरकार व जन जोडो अभियान अंतर्गत लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचा गौरव 

अमळनेर (प्रतिनिधी) मध्यप्रदेश सरकार व जन जोडो अभियान अंतर्गत राष्ट्रीय पाण्यावर झालेल्या कार्यशाळेत लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांचा मध्यप्रदेश सरकारकडून विशेष गौरव करण्यात आला. या कार्यशाळेत महाराष्ट्र तून सामुदायिक वन हक्कामधे स्थानिकांचा सहभाग व त्यांचे अधिकार  व त्यातून पाणी स्रोत आणि नैसर्गिक संसाधन यांचे नियोजन व व्यवस्थापन करण्याच्या …

गुरांचा ट्रक जाळून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक व मोडतोडप्रकरणी ११ जणांना ठोठावली शिक्षा

चोपडा यावल रोडवर घडली होती घटना, अमळनेर न्यायालयात सुरू होत कामकाज अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा शहरात २०१६ मध्ये गुरांचा ट्रक जाळून पोलिसांच्या वाहनांवर दगड फेक व मोडतोड करून ५ लाखाचे नुकसान केल्याची घडली होती. या प्रकरणी चोपडा येथील ११ जणांना अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली.     …

घराचे हप्ते मागायला गेलेल्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाकडून महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) घराचे हप्ते मागायला गेलेल्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाने महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना १२ रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर  तालुक्यातील सोंनखेडी येथील महिला शहरात शिव कॉलनी भागात राहते. ११ रोजी सकाळी ९ वाजता तिच्या घरी महेंद्रा अँड महेंद्रा फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक …

मुख्याध्यापक संजय भगवान पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

कोल्हापूरच्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे औरंगाबाद येथे पुरस्कार वितरण अमळनेर (प्रतिनिधी) कोल्हापूरच्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे अमळनेर तालुक्यातील मठगव्हान नालखेडा शाळेतील मुख्याध्यापक संजय भगवान पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.       गव्हर्नमेंट ऑफ आसाम टुरिझमचे संचालक डॉ. हृदय …

जुने बसस्टँड भागातून घरासमोर लावलेली २५ हजाराची  मोटरसायकल झाली चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील जुने बसस्टँड भागातून मोटारसायकल चोरीला गेली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बडोदा बँकेसमोरील अशपाक शाह फत्तु शाह मिस्तरी यांची २५ हजार रुपये किमतीची  मोटरसायकल( क्रमांक एम एच १९  ए सी ७७७६) अज्ञात चोरट्याने ९ रोजी रात्री घरासमोरून चोरून नेली. पोलीस …

अमळनेर शहरातील आठवडे बाजारातील  मोबाईल दुकानात चोरट्यांनी हातसफाई

पाचशे रुपये व सहा हजार दोनशे रुपयांचे दोन मोबाईल लांबवले अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजारातील एका मोबाईल दुकानात चोरट्यांनी हातसफाई केली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. शहरातील आठवडे बाजारात बादल घनश्याम पंजवाणी यांचे समवाद मोबाईल दुरुस्ती दुकान आहे. या दुकानातून अज्ञात चोरट्याने दुकानाचा कडी कोंडा तोडून पाचशे रुपये …

अमळनेरला १६ फेब्रुवारीला रंगणार अहिराणी, मराठी हास्य कवी संमेलन

शेती मातीच्या, राजकीय, सामाजिक, प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात १६ फेब्रुवारी रोजी “प्रेमाचा जांगड गुत्ता” फेम नारायण पुरी, दंभस्फोटक कवी भरत दौंडकर यांच्या उपस्थितीत अहिराणी, मराठी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे रविवारची सायंकाळ ही अमळनेरकरांसाठी हस्स्याची ठरणार आहे. शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) व खान्देश …

शासकीय योजनांसाठी होणारी फरपट थांबवण्यासाठी २० फेब्रुवारीपासून उपोषण

अमळनेर तालुका सरपंच संघटनेने प्रातांधिकाऱ्यांना दिला निवेदनाद्वारे इशारा अमळनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,  खरीप २०१९ दष्काळ अनुदान निधी योजना, प्रत्येक गावात स्वतंत्र कॅम्प लावणे बाबत. अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न पडणे बाबत व शेतकऱ्यांची होणारी फरपड, आर्थिक नुकसान, पिळवणक थांबण्यासाठी अमळनेर तालुका सरपंच संघटनेने २० फेब्रुवारीपासून उपोषणास बसण्याचा …