भाजपाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी हिरालाल पाटील यांची तर शहराध्यक्षपदी उमेश वाल्हे यांची  लागली वर्णी

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपची अमळनेर शहर व तालुकाध्यक्ष पदाची नियुक्ती करण्यात आली आहे. यात  तालुकाध्यक्षपदी दहिवद खुर्दचे माजी सरपंच हिरालाल पाटील यांची तर शहराध्यक्षपदी उमेश वाल्हे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातुन अनेक कार्यकर्त्यानी या पदांसाठी मुलाखती दिल्या होत्या. ही निवड जिल्हा कोअर कमिटीने केली आहे, त्यांच्या या निवडीचे आमदार स्मिताताई …

नागरिकत्व बिलाला रामदास आठवलेंच्या समर्थन  विरोधात यशवंत बैसाणे यांची पदत्याग करून आरपीआयला सोडचिठ्ठी

अमळनेर (प्रतिनिधी) केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नागरिकत्व बिलाला समर्थ केल्याने तालुक्यातील आरपीआयचे ग्रामीण तालुका अध्यक्ष यशवंत बैसाने यांनी निषेध करून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरपीआयचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बैसाने यांनी राजीनाम्यात म्हटले आहे की,  नागरिकत्व …

पत्रकारांच्या पाठीशी राजकीय, सामाजिक नेत्यांनी उभे राहिले पाहिजे ः आमदार अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी)- पत्रकार हे निर्भीडपणे आपले वृत्तसंकलन करीत असतात. अनेकदा चांगली बातमी ही अनेकांच्या लक्षात राहत नाही. मात्र दुखावणारी एखाद बातमी ही अनेकांच्या लक्षात राहते. त्यातून आकष निर्माण होऊन पत्रकारांवर दृष्टप्रवृत्तीतून हल्ले केले जातात. अशा वेळी या पत्रकरांच्या पाठीशी सर्वच राजकीय आणि सामाजिक नेते उभे राहिले तर लोकशाहीचा चौथा खांब …

”खबरीलाल” आणि ”अमळनेर न्यूज सेव्हन”च्या कार्यालयाचे पत्रकार दिनी थाटात उद्घाटन

अमळनेर  (प्रतिनिधी) गुलाबी थंडी, मंद सुराची गाणी आणि सर्वच सस्तरातील दिग्गजांनी हजेरी लावत ”खबरीलाल” आणि ”अमळनेर न्यूज सेव्हन”च्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पत्रकारदिनी सोमवार ६ जानेवारी रोजी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उत्तरोत्तर रंगत केला.  उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत आपल्या मनोगतातून खबरीलाल आणि अमळनेर न्यूज सेव्हनकडून पारदर्शी, निर्भिड, सडेतोड …

इलेक्टरेशियन कर्मचाऱ्याच्या डोळ्यात अॅसिड गेल्याने जखमी, रूग्णालयात उपचार सुरू

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर बसस्थानकावर प्रवाशी , विद्यार्थ्यांची दुपारी 12 वाजता मोठी वर्दळ असताना अचानक स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली. बॉम्बस्फोट म्हणत प्रवाशी व विद्यार्थी पळू लागले. बसमध्ये बॅटरीचा स्फोट झाला असे कळल्यावर मात्र सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.          अधिक माहिती अशी की तुषार …

धुळे तालुक्यातील मजुराचा मांडळ  येथील पांझरा नदीपात्रामधे बुडून मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील मजुराचा अमळनेर तालुक्यातील मंडळ येथील पांझरा नदीपात्रामधे बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. त्याचा दोन दिवसापूर्वीच बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मांडळ गावाचे श्रीशनी महात्मा जवळ पांझरा नदीपात्रामधे लालचंद शेना भिल (वय ६०) रा.इंदिरानगर तामसवाडी ता.जि.धुळे हा  मांडळ गावाचे पश्चिमेला नदीपलीकडे मृत अवस्थेत आढळून आला.  लालचंद  …

शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या  देशव्यापी संपामुळे कामकाज झाले ठप्प 

अमळनेर (प्रतिनिधी)आपल्याला विविध न्याय मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे शासकीय कामकाज ठप्प झाले होते. तर महसूल कार्यालयातील तसेच पंचायत समितीच्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांना व विविध दाखल्यांसाठी फिरणार्‍या विद्यार्थ्यांना खाली हात परत जावे लागले. मात्र तलाठी व ग्रामसेवक हे पीएम किसानची कामे करत होते. तालुक्यातील सर्व शिक्षक …