पांझरा नदीतून होणारा वाळू उपसा बंद करण्यासाठी मांडळला समिती स्थापन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमनतर्गत ग्रामसभा घेण्यात येऊन गावचा विकास आराखडा तयार करण्यात आला. तसेच पांझरा नदीतून होणारा वाळू उपसा बंद करण्यात यावा, यासाठी वाळू बचाव दक्षता समितीचाही स्थापना करण्यात आली. तसेच अन्य विविध विषयांवर सभा गाजून चर्चा करून निर्णय घेण्यात आले.  ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी …

अमळनेर येथील ढेकू रोडवरील टेकडीवरच न्यायाधिशांचीही निवास्थाने उभारण्यात येणार

अमळनेर(प्रतिनिधी) पोलिस वसाहतीसोबत आता न्यायाधीशांची निवासस्थानेदेखील ढेकू रोडवरील टेकडीवर बांधण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम खात्याने सव्वा एकर जागेचा ताबा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजीव पांडे यांच्याकडे देण्यात आला. या दोन्ही विभागांचे निवासस्थाने जवळच होणार असून त्यांचा निवासाच प्रश्न यामुळे सुटणार आहे. ढेकू रोडवरील नियोजित न्यायाधीश निवासस्थान जागेचा ताबा सोमवारी अमळनेर …

धार येथे महिलेने चक्क शेतातून चोरला कापूस, एकलहरे येथे एकाने केली अवैध वाळू वाहतूक

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथे शेतातून कापूस चोरताना महिलेला रंगेहात पकडण्यात आले तर एकलहरे येथे एकाला अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात संशयितांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी तालुक्यातील धार येथे २३ रोजी सकाळी ८ वाजता  शांताराम टोंगल …

ठाकरे सरकारने दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याने अमळनेरात शिवसनेतर्फे जल्लोष

अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या सरकाराने शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करून ८० टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला आहे. यामुळे आमचे सरकार ठाकरे सरकार,  बळीराजाचे सरकार ठाकरे सरकार, आशा  घोषणांनी रविवारी रात्री सुभाष चौकात शिवसेना अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. नुकत्याच नागपूर येथे विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या …

अभाविप आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच संघटनेने रॅली काढून नागरिकत्व सुधारणा कायद्याला दिले समर्थन

अमळनेर (प्रतिनिधी)  केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा संशोधन  कायदा (सीएए व एनआरसी ) च्या समर्थनार्थ अभाविप व राष्ट्रीय सुरक्षा मंच संघटनेतर्फे अमळनेर शहरातून रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होऊन सभेत रुपांतर झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. …

कृषीसंदर्भात वीज वितरण कंपनीचे आडमुठे धोरण बदलून कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि कृषिपंपांना दिवासा वीजपुरवाठ करण्यात यावा, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी उर्जामंत्री आणि कृषीमंत्रीय यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पुढील हंगामात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न यावे, यासाठी ग्रामीण भागातील कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी राज्याचे …