अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रखडलेल्या पाडळसरे धरणाबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांनी नागपूर अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. तसेच अमळनेर शहराचे वैभव असलेल्या दगडी दरवाजा दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार स्मिता वाघ यांनी विधानसभेच्या सभागृहात निधीअभावी दुर्लक्षित असलेल्या पाडळसरे प्रकल्पासंदर्भात विविध प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित …
अमळनेर येथून विद्यार्थ्यांसाठी पुणे रेल्वे गाडी सुरू करण्याची डीआरएम यांना घातले साकडे
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथून विद्यार्थ्यांसाठी पुणे रेल्वे गाडी सुरू करावी. फ्लॅटफार्मवर वृद्धांसाठी लिप्ट कार्यान्वित करावी आदी मागण्या रेल्वे स्थानिक सल्लागार समितीने डीआरएम जी. व्ही. एल. सत्यकुमार यांच्याकडे केल्या. अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर रविवारी मुंबई येथून आलेले डीआरएम जी. व्ही. एल. सत्यकुमार यांनी भेट दिली. दुपारी ३ वाजेला त्यांची दोन डब्याची गाडी अमळनेर स्थानकावर …
ह.भ.प. संतश्री प्रसाद महाराज यांचे पंढरपूर अमळनेर नगरीत लोक प्रतिनिधींनी केले स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) प्रतिपंढरपूर नगरी अमळनेरचे ह.भ.प. संतश्री प्रसाद महाराज यांचे पंढरपूर अमळनेरनगरीत लोक प्रतिनिधींनी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे, डांगरीचे लोकनियुक्त सरपंच अनिल शिसोदे, काँग्रेस (आय) चे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, प्रकाश महाजन, सुभाष भोई, बापू …
वरिष्ठांच्या हलगर्जीपणास कंटाळून तालुकाध्यक्ष अनंत निकम यांनी संभाजी ब्रिगेडला केला बाय
अमळनेर (प्रतिनिधी) वरिष्ठांच्या हलगर्जीपणास कंटाळून संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अनंत निकम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा हा जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्याकडे पाठवला आहे. निकम यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, सन २०१७ पासून संभाजी बिग्रेडचा तालुकाध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहोत. मागील काही महिन्यांपूर्वी शासकीय कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचारा …
परीक्षेतील गुणांना अधिक महत्व न देता विद्यार्थी घडवणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा
अमळनेर(प्रतिनिधी) माहिती तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे शिक्षण सर्वव्यापी झाले आहे. शिक्षणासह अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी परीक्षेतील गुणांना अधिक महत्व न देता विद्यार्थी घडवणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता,कल्पकता, नवनिर्मितीचा शोध घ्यावा असेही प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बाबा नंदनपवार (नागपूर) यांनी केले. येथील लो.टिळक स्मारक समितीच्या शतक महोत्सवी सांगता समारोहानिमित्त …
डिजिटल मीडियाच्या (वेब पोर्टल) हक्क आणि अधिकाराची मुख्यमंत्र्यांना करून दिली जाणीव
अमळनेर – नागपूर (प्रतिनिधी) सध्याच्या युगात डिजिटल मीडियाचे महत्व वाढले असून सामान्य नागरीकांपर्यंत जलद व विनाशुल्क, अचूक माहिती पूरविण्याचे कार्य डिजिटल मीडिया करत आहे. त्यामुळे या डिजिटल मीडियाला (वेब पोर्टल) त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असोसिएशन ऑफ डिजीटल मीडिया अॅन्ड इंडिपेंडन्ट न्यूज …
मुस्लिम धर्मातील सर्व जातींमधील १० जोडप्यांचा फक्त ११ रुपयात लावला थाटात सामूहिक ‘निकाह’
अमळनेर (प्रतिनिधी) मुस्लिम धर्मातील सर्व जातींमधील गोरगरीब १० जोडप्यांचा फक्त ११ रुपयात मोठ्या थाटात सामूहिक विवाह लावून शहरातील हसनैन करिमैन वेल्फेअर संस्थेने समाजापुढे एक आदर्श ठेवला. विशेष म्हणजे या जोडप्यांना सांसारिक साहित्य आंदण म्हणून दिले. मुस्लिम धर्मांत शेख , पठाण , तेली , खाटीक , सैय्यद , मण्यार , बेलदार , शाह , …
बालरोगतज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांच्या चित्रातून उमटले त्यांच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या कलेचे ‘प्रतिबिंब’
अमळनेर(प्रतिनिधी) येथिल सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या शेकडो चित्रांचे ‘प्रतिबिंब’ या २ दिवसीय भव्य चित्र प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी कस्तूरबा बाविस्कर व शंकरराव बाविस्कर यांच्या हस्ते झाले.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी डॉ. बाविस्कर यांच्या चित्रकलेचे भरभरून कौतुक केले. ‘प्रतिबिंब’ चित्रपदर्शनाच्या उदघाटन संभारंभात डॉ. शरद …