मारवड पोलिसांनी धाड टाकून चिखली नाल्यात अवैध हातभट्टी केली उध्वस्त

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील  निभोंरा या गावातील चिखली नाल्यामधे सुरू असलेली गावठी हातभट्टी उध्वस्त मारवाड पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केली. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी धाड टाकल्यावर बाबुलाल महादु कोळी रा.निभोंरा व देविदास आधार भिल रा. दोधवद हिंगोणे हे दोघे गावठी हातभट्टी दारु लावुन दारु पाडतांना, भरतांना व कब्जात बाळगतांना आढळून …

पैसे संपल्याने त्रस्त झालेल्या गुन्हेगारची नस ओळखून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अमळनेर (प्रतिनिधी) गोळीबार आणि रस्ता लुटीच्या गुन्ह्यातील फरार टोळीतील एका गुन्हेगाराचे पैसे संपल्याने त्रस्त झाल्याने तो मित्रांच्या संपर्कात आल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीला सूरत येथून अटक केली आहे. पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथील गोळीबार प्रकरण व जानवे डांगर दरम्यान रिव्हॉल्व्हर लावून चौघांना लूटमार प्रकरणातील हा चौथा आरोपी …

डॉ. प्रियांका रेड्डीप्रकरणी अमळनेर पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी संघटनेने  एकवटून निषेध 

अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना व पशुवैद्यकीय व्यवसायी  संघटनेतर्फे तहसीलदार मिलिंद वाघ यांना बुधवारी निवेदन देऊन डॉक्टर प्रियांका रेड्डी यांची निघृण हत्या व बलात्कार घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेचा देशभरातून याबाबत निषेध व्यक्त केला जात असून, अटक केलेल्या चौघांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही होत आहे. जंगली प्राण्यांनाही …

अमळनेरात शुक्रवारपासून दोन  दिवसीय विज्ञान प्रदर्शन रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.  स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये  प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञाननगरीची जय्यत तयारी सुरू आहे. शाश्‍वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर हे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन रंगणार आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन …

मुडी सोसायटीच्या चेअरमनपदाची संजय पाटील, तर व्हा.चेअरमन पदाची शोभा सोनवणे यांच्यावर सोपवली धुरा

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय गुलाबराव पाटील तर व्हा चेअरमनपदी शोभा सोनवणे यांच्यावर धुरा सोपविण्यात आली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनीची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. येथील सोसायटीची निवडणूक सर्वपक्षीय झालेली  असून सर्वांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या सदस्यांना चेअरमन पदाची धुरा सोपविण्यात येते. त्यानुसार या दोघांची निवड करण्यात आली. …

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहर निरीक्षकपदी अमळनेरच्या रंजनाताई देशमुख यांची लागली वर्णी

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रंजनाताई देशमुख यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहर निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी देशमुख यांना पाठवलं आहे. या निवडी बद्दल देशमुख यांचे आमदार अनिल भाईदास पाटील, जिप सदस्या,जयश्रीताई अनिल पाटील, व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे. …

एड्स बाधितांना योग्य पोषण आहारसाठी ६ प्रकारचे कडधान्य आणि मास्क केले वाटप

अमळनेर(प्रतिनिधी)रोटरी क्लब अमळनेर ग्रामीण रूग्णालयात एड्स बाधितांना योग्य पोषण आहार मिळावा ह्या हेतूने प्रत्येकाला ६ प्रकारचे कडधान्य व मास्क वाटप करण्यात आले. एड्स सप्तहनिमित्ताने दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता अमळनेर ग्रामीण रूग्णालयातील आय.सी.टी.सी. व ए आर टी सेन्टर येथे एड्स बाधितांना योग्य पोषण आहार मिळावा ह्या हेतुने प्रतेकाला …

घरकुलसह कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने बंगाली फाईल भागातील नागरिक नगरपालिकेवर धडकले

अमळनेर (प्रतिनिधी)  गेल्या ७० ते ८० वर्षापासून रहिवास असलेल्या अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील रहिवाश्यांची स्वतःच्या नावावर घरे नसल्याने कोणताही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी नगरपालिकेने मदत करावी या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी मंगळवारी एकत्र येत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली.  शहरातील बंगाली फाईल परिसर हा …