अमळनेरच्या चाणक्याला सुआश्रू नयनांनी दिला भावपूर्ण निरोप

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे भाजापाचे सर्वाधिक यशस्वी माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना सुआश्रू नयनांनी शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे मूळ गाव डांगर बु. येथे दुपारी १२ वाजात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आला. त्यांना मुलगी भैरवी, इशा आणि तिन नंबरच्या भावाचा मुलगा तिलक यांच्या हस्ते मुखाग्नी दिला. …

अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभे राहणार

अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याच्या आठवणी नेहमी तेवत ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अमळनेरात उदय वाघ यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणारे नाही. त्यांनी अनेक सर्व सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना घडवले आहे. उभे केले आहे. भाजपासाठी भरीव असे काम …

चिरनिद्रेत विसावला ढाण्या ”वाघ”… !

संरपंचापासून ते राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या जिल्हाध्यक्षापर्यंत डांगर गावच्या उदय (ढाण्या) वाघ यांनी आपल्या यशस्वी कार्यशैलीची परिसीमा अधोरेखित केली होती. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झाले होते. म्हणूनच आपल्या संघटन कौशल्याने भाजला जिल्ह्यात मोठे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र या वाघाच्या उदयपर्वाचा …

सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी वाढदिवसाला गरजू महिलेला रक्तदान करून निभावले सामाजिक दायित्व

अमळनेर(प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आपल्या जन्मदिनानिमित्ताने गरजू रुग्ण महिलेसाठी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले. तसेच सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देत एक सामाजिक आदर्श घालून दिला. अमळनेर येथील मिल चाळ भागातील संगीता बारस्कर या महिलेस डॉ. बी एस पाटील यांच्याकडे  तीन पिशवी  A+ रक्तगटाची तातडीने आवश्यकता असल्याचे आणि सदरचे A+ …

ज्योतिराव फुले यांनी देशाच्या विकासासाठी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : केंद्रप्रमुख अरूण मोरे

अमळनेर (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले भारतीय इतिहासातील पहिले कर्तै सुधारक आहेत. स्त्री शिक्षणाशिवाय या देशाचा विकास शक्य नाही म्हणून त्यांनी भारतातील अर्धांग असलेल्या स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे हे सोदाहरण पटवून दिले, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख अरूण मोरे यांनी केले.  बोलत होते. देवगांव देवळी …

वृद्ध माता पित्यांना न सांभाळणार्‍या मुलगा, सुनेवर गुन्हा दाखल करून घडविली अद्दल

अमळनेर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही वृद्ध माता पित्यांना उपजीविकेला पैसे न देणार्‍या अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील मुलगा व सुनेविरुद्ध माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील सुरेश बुधा बडगुजर यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिली की, …

अमळनेर शहरातील कबरस्थानमध्ये चोराने  बोअरिंगच्या साहित्यावर मारला डल्ला

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कबरस्थानमध्ये अज्ञात चोरट्याने बोअरिंग साहित्य चोरून नेल्याची घटना  १७ नोव्हेम्बर रोजी घडली. याबाबत अब्दुल  कादर शेख इब्राहिम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कबरस्थानमध्ये अज्ञात चोरट्याने बोअरिंग स्टार्टरची तांब्याची तार , लोखंडी अँगल आदी चोरून नेले. याप्रकरणी  पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संजय वणा पाटील …

चोरट्यांनी वावडे येथून सहा गायी चोरून नेल्या, मारवड पोलिसात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातून वावडे येथून सहा गायी चोरून नेल्याचा प्रकार २८ रोजी सकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील वावडे येथील विनोद जगन्नाथ पाटील यांची  पांढऱ्या रंगाचे जरशी ४० हजारांची  गाय व इतर ग्रामस्थांची २ गायी तसेच तीन …

अमळनेर धुळे रस्त्यावर लूटमार प्रकरणी  एकाच्या नाशिक येथून आवळल्या मुसक्या 

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर धुळे रस्त्यावर कर अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पिस्तूल दाखवून लुटणाऱ्या टोळीतील एकाच्या मुसक्या चौघांना  एलसीबी पोलिसांनी नाशिक येथून आवळल्या आहेत. त्यांच्याजवळील ४ मोबाईल २ मोटारसायकली व रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याची समजते. त्याच्या साथीदारांना ही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. धुळे रस्त्यावर लूटमार झाल्याची …