अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाच बचतगटांना व्यवसायासाठी पंचायत समितीने गाळे उपलब्ध करुन दिल्यानंतर या बचत गटांनी शाळा करीत पोटभाडेकरू ठेवले. त्यामुळे पंचायत समितीच्या मूळ हेतूला हरताळ फासल्या गेल्याने पंचायत समितीने कठोर पावले उचलत हे गाळे ताब्यात घेतले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून पोलिस संरक्षणात हे गाळे बचत गटांकडून सोमवारी ताब्यात घेण्याची कारवाई …
चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या कन्हेरे येथील चिंचदेवी यात्रेची जय्यत तयारी
अमळनेर (प्रतिनिधी) भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या तालुक्यातील बोरी नदी काठावरील कन्हेरे येथील चिंचदेवीच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास बुधवारी २० नोव्हेबरपासून सुरुवात होत आहे. यामुळे गावात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण असून यात्रोत्सवासाठी बाहेरगावी गेलेले कुटुंबीयही यात्रोत्सवासाठी परतत आहेत. यामुळे घराघरात कौटुंबीक आनंद असून चिंचदेवीच्या घोषणाने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाली असून गावा यात्रेची …
चांगल्या नेतृत्वाची निवड करून अमळनेरचा आवाज विधानसभेत पोहचवला – रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन
अमळनेर(प्रतिनिधी) अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली, मात्र बळीराजा टिकण्यासाठी आणि लोकशाही जीवंत राहण्यासाठी पवारांच्या लढ्याला साथ देणाऱ्या मावळ्यांचे आणि महिलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि चांगल्या नेतृत्वाची निवड करून अमळनेरचा आवाज विधानसभेत पोहचविण्याचा जो निर्णय घेतला, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर …
अवैध वाळू चोरटय़ांची मुजोरी वाढली, ट्रक व जेसीबी मशीन पळवले
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात अवैध वाळू चोरटय़ांची मुजोरी वाढली आहे. जळोद येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक व जेसीबी मशीन मालकाने महसूल कर्मचाऱ्यांच्या तावडीतून वाहने पळवली आहेत. याप्रकरणी अमळनेर पोलिसात चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,रविवारी १७ रोजी सायंकाळी ६ …
अमळनेरात पैलाड रोड व गांधलीपुरा भागात छापा टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त, ८ जुगारी केले अटक
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पैलाड रोड व गांधलीपुरा भागात छापा टाकून पत्याचा जुगार खेळणाऱ्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसाना पाहून अनेकांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी आठ जुगारीना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे. या बाबत माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दीपक माळी, शरद पाटील, …