बेडर शिक्षण विभाग आणि सीईटी सेल खेळतोय विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ

अमळनेर(प्रतिनिधी) पूरग्रस्त भागात विद्यार्थी कसे जाणार शिक्षण विभाग व सीईटी सेल तर्फे गेल्या महिन्यात डिप्लोमा इन फार्मसी व डिप्लोमा इन इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी व इंजीनियरिंग डिग्रीसाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू केली होती, त्यात पहिल्यांदा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट वरून घातलेल्या घोळा नंतर आता आणखी एक नवीन प्रकरण समोर येत …

मंगळ ग्रह सेवा संस्थे चे आभार व अभिनंदन ; पुरग्रस्ताना सर्वप्रथम दिला मदतीचा हात

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागात अन्नदान व अनुषंगिक मदत करत मंगळ ग्रह सेवा संस्थेने तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वप्रथम धाव घेतली. अवघ्या दोन तासात 1200 ते 1500 पुरग्रस्ताना भोजन देण्यात आले. एक धार्मिक संस्था केवळ देव धर्म धरून न बसता विविध सामाजिक कार्यात ठोस पुढाकार घेत …

चिखलात फसलेल्या मोराला दिले जीवदान

अमळनेर (प्रतिनिधी) जोरदार पावसामुळे चिखलात फसलेल्या मोराला बाहेर काढून त्याच्यावर उपचार करून मंगरूळ येथील शेतकऱ्याने त्याचे प्राण वाचवले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले तालुक्यातील मंगरूळ येथील अंबर नाईक हे पावसामुळे शेताची काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी 10 रोजी सकाळी शेतात गेले असता त्यांना चिखलात फासलेला एक मोर उडण्याचा प्रयत्न करताना दिसला …

नगरपरिषदेचे ७० हजाराचे भंगार विकून खाल्ल्याचा ढेकर दिल्याने झाली बोंबाबोंब…

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर नगरपरिषदेचे भंगार चोरीचा प्रकार उघडीस आला आहे. यात एक कमर्चारी आणि एक उपमुख्याधिकारी दर्जाचा अधिकारी अडकल्याचा संशय बळावला असून तसे धागेदोरीही पोलिसांच्या हाती आले आहेत. त्यामुळे हे भंगार चोरीप्रकरण चांगलेच गाजणार असून संबंधित सर्वांनाच त्याचे उत्तरे द्यावी लागणार आहे. हे प्रकरण अंगलट येऊ लागल्याने आता नगरपालिकेच्या वरिष्ठांकडून …

आमदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने रणाईचा गावाचे विभाजन; बंजारा समाजाला दिला न्याय..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील रणाईचे गांवाचे विभाजनाची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाच्याद्वारा जारी केली असून रणाईचे बु. व रणाईचे खु ह्या गांवाची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्वाधिक बंजारा समाज बहुल लोकवस्तीचा रणाईचे येथील तांड्याचा समावेश रणाईचे ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आला होता. यामुळे तांडा वस्तीला भौतिक मुलभूतसुविधा उपलब्ध करण्यास अडचणी निर्माण …

‘शिक्षणाच्या आयचा घो’ करीत पालकांनीच गळकी आणि जीर्ण शाळेला ठोकले कुलूप

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील जिल्हा परिषदेची संपूर्ण शाळा संततधार पावसामुळे गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास वर्गात जागा नाही, शाळा जीर्ण झाल्याने स्लॅबला तडे गेले आहेत. त्यामुळ विद्यार्थी जीव धोक्यात घालून वर्गात बसत आहेत. त्यामुळे ‘शिक्षणाच्या आयचा घो’ करीत संतप्त पालकांनी शुक्रवारी शाळेला टाळे ठोकले. पालकांनी याबाबत गटशिक्षणाधिकारी आर. डी. …

पडझड झालेल्या घरांचे आ चौधरींच्या सुचनेमुळे झाले तात्काळ पंचनामे

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात झालेल्या संततधार मुसळधार पावसाने शहरातील भोईवाड़ा परीसरातील अनेक घराची पडझड झाल्याने आ शिरीष चौधरी यांनी पावसातच तातडीने घटनास्थळ गाठून पीडित कुटुंबियांना दिलासा देत अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.तसेच पांझरा काठावरील पूरग्रस्त गावांना भेट करून ग्रामस्थांना धीर दिला. भोईवाडा भागातील सदानंद भोई, विठ्ठल भोई, गयभू भोई, जवाहरलाल …