अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात देव दर्शनाला आलेल्या टाकरखेडा येथील महिलेला चांगलेच महागात पडले. ते देवदर्शन करून घरी परतत असताना बसमध्ये त्यांची ४५ हजाराची सोनपोत लांबल्याची घटना घडली. अमळनेर जळगाव बसमध्ये चढताना टाकरखेड्याच्या महिलेची ४० हजार रुपयांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यने लंपास केल्याची घटना ५ रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली …
तरुणावर उपचार करणारे ‘देवदूत’ डॉक्टर, औषध विक्रेता ठरले ‘यमदूत’
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात सात महिन्यांपूर्वी घडलेली घटना लहान, मोठ्या आजारांवर उपचार करून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच असल्याने त्यांनी केलेल्या उपचारांवर डोळे झाकून आपण विश्वास ठेवतो. अनेक डॉक्टर प्रामाणिकपणाने चांगले उपचारही करतात. मात्र यातील काही डॉक्टर रुग्णाच्या जीवावर उठून ‘देवदूत’ ऐवजी ते”यमदू”च ठरत आहे. असाच प्रकार अमळनेर येथील तरुणाच्या …
बाजार समितीत राजपूत, धनगर, माळी, तेली समाजाला प्रतिनिधीत्व देऊन ‘राजकीय मशागत’
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वर महाजन, तेली, राजपूत, धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ‘राजकीय मशागत’ करण्यात आली आहे. बाजार समितीच्या स्विकृत संचालकपदी आटाळे येथील प्रकाश भिमसिंग पाटील तर तज्ज्ञ संचालकपदी कळमसरे येथील मुरलीधर महाजन, शिरूड येथील डी. ए.धनगर व जळोद येथील एम डी चौधरी …
पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा रात्रभर पाहरा देऊन नागरिकांचे करणार संरक्षण
अमळनेर(प्रतिनिधी) पांझरा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या अमळनेर तालुक्यातील गावांमध्ये तालुका प्रशासन अधिकारी व कर्मचारी रात्रभर पहारा देऊन नागरिकांचे संरक्षण करणार आहेत. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा (पांझरा नदी) धरणातून संपूर्ण एकूण-१७ दरवाज्यांतून आज ५ जुलै रोजी दुपारी ३८,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे .सदर विसर्ग जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील नदी काठच्या …
अवैध धंद्यांना पोलिसांना जबाबदार धरत आमदार स्मिता वाघ यांनी तोफ डागत आमदार शिरीष चौधरींवर साधला निशाणा….
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मोठ्याप्रमाणावर दारूचे गुत्ते, सट्टा, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांनी अमळनेकरांचे आरोग्य बिघडत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अमळनेरात नंदुरबार मार्गे अवैध पद्धतीने येणाऱ्या बनावट आणि विषारी दारूचा उद्रेक झाला असून शहरात ठिकठिकाणी दारूचे गुत्ते निर्माण झाले असून याला सर्वस्वी जबाबदार पोलिस असल्याचा …
अमळनेरचे ‘एबीपी’हातावरची घड्याळ काढून लवकरच टाकणार‘बीजेपी’च्या फुलांची माळ..?
अमळनेर (खबरीलाल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खान्देशात ८ ऑगस्ट रोजी पर्दापण करणार आहे. या यात्रेच्या पालखीचे भोई होण्यासाठी खान्देशातील अनेक नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहे. यात अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे एक नेतेही आपली ‘घड्याळ’ उतरवून ‘फुल’ हातात घेणार आहेत. मात्र ते मुळातच भाजपावासीय असल्याने ते आपल्या घरवापसीच्या …
पांझरा नदीच्या पुराने ओलांडली धोक्याची पातळी, अमळनेर तालुक्यातील गावांना सर्तकतेचा इशारा..
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीच्या उमगमस्थानावर रविवारी जोरदार पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणात मोठ्याप्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे पाणी पांझरा नदीत सोडण्यात आल्याने पांझरा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. ही नदी अमळनेर तालुक्यातील काही गांवामधून जात असल्याने या नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून तालुका प्रशासन …