खेळी व्यवहारदळे येथे तहसिलदार देवरे, पोलिस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील खेळी व्यवहारदळे येथे कार्यक्रमाचे आयोजक पोलिस पाटील लखिचंद पाटील व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकांना झाडांचे महत्व व त्यापासून होनारे फायदे शेतकरी हिताचे प्रश्न आपल्या मार्गदर्शनातून जि.प.मराठी शाळा व सप्तश्रृंगी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अमळनेरचे तहसिलदार सौ ज्योती देवरे,अमळनेरचे नुतन पोलिस …

अल्पवयीन मुलीचे अपहरण पोलिसात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी १८ रोजी दुपारी फूस लावून पळवून नेले असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत.

अखेर दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सात्री येथील ३५ धरणग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय

आ.शिरीष चौधरींनी मिळवून दिली भूसंपादनाचा मोबदला,शेतकरी बांधवात समाधान अमळनेर (प्रतिनिधी) तब्बल दोन वर्षांनंतर पाडळसरे धरणांतर्गत येणाऱ्या सात्री गावातील ३५ शेतकऱ्यांना भूसंपादनाचा ५० टक्के मोबदला मिळाला आहे. यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन आगाऊ अनुदान देण्यास सहकार्य केले. तालुक्यातील सात्री हे गाव पाडळसरे धरणांतर्गत पूर्ण जाणार आहे. २००३ मध्ये …

अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपयांचा माल केला लंपास..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर रेल्वे कॉलनीत अज्ञात चोरट्याने घर फोडून सुमारे ४० हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना २० रोजी पहाटे घडली. राजेंद्र सीताराम पाटील रा रेल्वे कॉलनी हे १९ रोजी सकाळी फतेपुर ता.जामनेर येथे कुंटुबासह घराला कुलुप लावुन साखरपुड्यासाठी गेले होते २० रोजी सकाळी ते गावावरुन परत आल्यावर घराचे कुलुप लोखंडी …

पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे शासनाच्या ३३लक्ष वृक्ष रोपणाच्या मोहिमेअंतर्गत वृक्षरोपण

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे शासनाच्या ३३ लक्ष वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले. सुरुवातीला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ.कल्पना पाटील यांनी केले. यावेळी ग.स.सोसायटी ,जळगाव चे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे व शाळेचे चेअरमन , चंद्रकांत भदाणे यांची उपस्थिती होती. शाळेच्या प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन …