आधी केले “श्रमदान” मग केले “मतदान”… गावाचा एकच पक्ष फक्त पाण्यावर लक्ष’.!

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने एकजूट करून मंगळवारी सकाळी श्रमदान करून नंतर दुपारी सव्वादोन वाजता वाजंत्री वाजवत एकाचवेळी साडे तीनशे मतदार मतदानाला निघाले. लोकसभा निवडणुकीच्य माध्यमातून गावकऱ्यांच्या एकीचे प्रदर्शन झाले. ‘आधी केले श्रमदान आता करू मतदान’, ‘आमच्या गावाचा एकाच पक्ष पाण्यावर लक्ष’, ‘मिलके बोलो एकसाथ’, ‘दुष्काळाशी दोन हात’, अशा विविध घोषणा दिल्या …

मतदान असूनही भाविक द्वीशताब्दी कार्यक्रमात सहभागी, १० हजार लोकांना महाअन्नदान.

पारंपरिक पद्धतीने अग्नि प्रज्वलित अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे मंगळवारी मतदान असून देखील खानदेशातील मोठा असा असलेल्या संत सखाराम महाराज द्वीशताब्दी महोत्सव सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला. सकाळी धार्मिक कार्यक्रमात काकड आरती व भजन संपल्यानंतर दादा महाराज शिरवळकर यांच्या कृष्णा महाराज अरगडे व कोमलसिंग महाराज हेंदरुनकर यांच्या नेतृत्वात बोरी नदीपात्रातील गाथा मंडपात यासाठी …

अमळनेर तालुक्यात जळगांव लोकसभा मतदार संघासाठी एकूण ५३.३५ टक्के मतदान…

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर तालुक्यात जळगांव लोकसभा मतदार संघासाठी एकूण ५३.३५ टक्के मतदान झाले सकाळी मतदार ऊत्साहात होते तप्त ऊन्हामूळे दूपारी २ ते ५ या वेळेत मतदान मंदावले होते ६ मतदान केंद्रात मतदान यंत्र खराब झाल्याने अर्धा तास मतदान ऊशिरा सूरू झाले त्यात जिएस विद्यालय तांबेपूरा राजवड नंदगांव ढेकू …

पेट्रोल पंपाच्या मालकास मारहाण पोलिसात गुन्हा दाखल.

अमळनेर (प्रतिनिधी) दारूच्या नशेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या दोघांनी पंपावरील दोघांच्या डोक्यात दगड व विटांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. शिवशक्ती चौक तांबेपुरा येथील गजानन जगन्नाथ पाटील व तन्वीर रहेमतुलला पिंजारी हे गलवाडे रोड वरील प्रमुख पेट्रोल पमपावर दारूच्या नशेत पेट्रोल …