अमळनेर (प्रतिनिधी) जळगांव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमलेले स्थायी निगराणी पथक (नाका बंदी पथक) जागेवर न आढळून आल्याने सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून त्यांच्या कडून तात्काळ खुलासा मागितला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात बाहेरून येणाऱ्या वाहनांवर तसेच अवैध पैशावर नजर ठेवण्यासाठी धुळे रस्त्यावर चोपडाई कोंढावळ,शिंदखेडा …