अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास कोणत्याही परिक्षेत यश निश्चित – निरज अग्रवाल

अमळनेर (प्रतिनिधी) जीवनातील सर्वच क्षेत्रातील यशासाठी अभ्यास महत्त्वाचा असुन अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास कोणत्याही परिक्षेत यश निश्चित मिळते.त्यासाठी परिश्रमाची तयारी ठेवावी असे प्रतिपादन खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.निरज अग्रवाल यांनी केले. प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे आयोजित दहा दिवसीय सेट/नेट परिक्षा पुर्वतयारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. आर.चौधरी होते. …