सरजू शेठ गोकलानींच्या बंगल्यावर समाजातील विविधरंगी व्यक्तिमत्वांनी लुटला होळी चा आनंद.. अमळनेर( खबरीलाल) संपूर्ण देशभर होळी,रंगपंचमी चा उत्साह सर्वत्र दिसत असतांना अमळनेरलाही तरुण, महिला,नागरिक आणि बालक रंगपंचमी जोशात साजरी करत आहे. तर अशीच कोरडी होळी रंगपंचमी च्या माध्यमातून साजरी करण्याची परंपरा येथिल सुप्रसिद्ध बहुविध व्यावसायिक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस …
वृक्षवल्ली परिवारा तर्फे महिलांची पर्यावरण पूर्वक रंगपंचमी साजरी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील वृक्षवल्ली परिवारा तर्फे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली इको फ्रेंडली पर्यावरण पूर्वक रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी कोणतेही रासायनिक रंगाचा उपयोग न करता नैसर्गिक रंग वापरण्यात आले.तसेच अमळनेर येथील पाण्याचा दुर्भिक्ष्य असल्याने रंगपंचमी खेळताना पाण्याचा उपयोग करण्यात आला नाही. वृक्ष वल्ली परिवार नेहमी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित …
आचारसंहिता निवडणूकीची मात्र कुणाला कुणाचा मेळ नाय अशी सहाय्यक निवडणूक कार्यालयाची अवस्था….
निवडणूक कार्यालयाकडून माहीती पासून प्रेस मीडिया वंचित अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन )आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी अमळनेर उपविभागात सर्वविभाग प्रशासकीय राजकीय विभाग यांच्या बैठका झालेल्या नाहीत. झाल्या असतील तर त्याबाबत मीडियाला माहिती नाही अशी स्थिती आज अमळनेर विभागाची झाली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक आचार संहिता कक्ष स्थापन …
बुरा ना मानो होली है….
घरकुल की हवा रास आयी, हाथ से आमदार की तो गयी फिर भी…. खासदार की के लिये आवाज आयी, यही तो है जेल की सही कमाई.! ओळखा कोण…? किती ही करा कटकटी नाव माझे ए.टी., एक दशक कमळासंगे वाजवली शिटी… खाई त्याला खवखवे तसा मी पण नटखटी, तिकीट मलाच मिळेल …
टाकरखेडा येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील एका तरुणाने अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना १५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. टाकरखेडा येथील एक अल्पवयीन मुलगी १४ रोजी सायंकाळी ७ वाजता तिच्या मावशी आशाबाई कडे झोपायला गेली होती १५ रोजी सकाळी तिचे आईवडील शेतात मजुरीसाठी गेले होते सायंकाळी ते …
तरुणीची बगिच्यात ओढणी ओढून जळगावच्या मु.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्याची तरुणीला वेळोवेळी मरून जाण्याची धमकी देऊन तिचे चोरून काढलेले फोटो भ्रमणध्वनिवरून व्हायरल करून बदनामी करणाऱ्या जळगाव मु.जे. महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यावर विनयभंगचा व माहिती तंत्रज्ञान कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावेर येथील रहिवासी असलेला व जळगाव येथील मु जे महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहणारा राहुल बारकू बारेला …
पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी
अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील मांडळ येथील विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पती व सासू याना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनावल्याने आरोपीना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे १५ रोजी मांडळ येथील विवाहित सोनाली राजू कांबळे हिने दुपारी २ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर छताला दोरी बांधून आत्महत्या केली होती तिची आई आशाबाई अनिल म्हस्के हिने …
अमळनेरात ठाकूर जमातीचा शिमगा उत्सव जल्लोषात साजरा..
अमळनेर(प्रतिनिधी)येथिल ठाकूर जमातीच्या वतीने शिमगा उत्सवास आज होळी ला अग्नी देऊन सुरवात झाली. अनुसूचित ठाकूर जमातीचा प्रमुख सण म्हणून पारंपरिक पद्धतीने होळी मोठ्या उत्साहात ठाकूर समाजाने सामूहिकपणे एकत्र येत ‘होळी रे होळी’ च्या जल्लोषात साजरी केली. ठाकूर जमातीच्या संस्कृतीत होळी सणाचे सांस्कृतिक महत्व अनन्य साधारण आहे. होळीच्या निमित्ताने नव्या पोषाखात …
अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे प्रि प्रायमरी विभागातील सिनियर के.जी च्या विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सिनी.के जी प्रि प्रायमरि विभागातुन इ १ ली प्रायमरी विभागात यशस्वी पदार्पणासाठी काॅन्होकेशन कॅप व प्रमाणपत्र देऊन प्राचार्य विकास चौधरी व प्रशासन अधिकारी अमोल माळी यांच्या हस्ते गौरवण्यात आले …