२० कोटींचा निधी,आ शिरीष चौधरींची आजोळ परिसरातील गावांना मोठी भेट अमळनेर(प्रतिनिधी)येथील आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जळोद ,अमळनेर ते पारोळा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून डांबरीकरणा सोबतच 7 मिटर रुंदीचा हा रस्ता होत आहे, या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असताना अमळगाव हे आ चौधरी यांचे आजोळ असल्याने …
उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्काराने शिक्षक सन्मानित!
अमळनेर : जळगाव जिल्हा क्रीडा विभाग व अमळनेर तालुका क्रीडा समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील महेश माळी व संजय बोरसे यांना उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला तसेच दोन उत्कृष्ट खेळाडू व दोन प्राथमिक व दोन माध्यमिक शाळांचा ही गौरव करण्यात आला. पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल चे महेश माळी व …
पाडळसे धरणाला पैसा न दिल्यास सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करू….
धरणास निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतसारा व लाईटबील भरू नये, महामोर्चा न्यावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा.!’ पाडळसरे धरणाच्या बैठकीला ह्या लोकप्रतिनिधींची हजेरी…. आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, धुळे येथील माजी आमदार शरद पाटील यांनीच उपस्थित राहून पाडळसरे धरणासाठी आस्था दाखवली. अमळनेर( प्रतिनिधी)पाडळसे …
अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या त्या आरोपीवर गुन्हा दाखल
अमळनेर – येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलीला कुऱ्हाळदा ता जळगाव येथील तरुणाने फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी मुंबई येथुन ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध बलात्कार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणीला पळवून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी …
सरस्वती विद्या मंदिर शाळेत ‘रंगारंग उत्सव’ उत्साहात संपन्न
अमळनेर( प्रतिनिधी) येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा विविध कलागुण प्रदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘रंगारंग उत्सव’ नुकताच उत्साहात संपन्न झाला.यावेळी आयोजित आंनद मेळाव्यात विद्यार्थिनींनी मोठ्यासंख्येने सहभाग घेतला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेत सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कला गुणांचे प्रदर्शन करणारा कार्यक्रम ‘रंगारंग उत्सव’आयोजित करण्यात येतो.उदघाटन प्रसंगी मुख्याध्यापक रणजित …
मुडी-मांडळ जिल्हापरिषद गटात आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते विकास कांमाचे भूमिपूजन
गलवाडे,झाडी,एकलहरे,एकतास,शिरसाले,आटाले गांवाचा समावेश अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील मुडी-मांडळ जिल्हापरिषद गटातील गलवाडे ,झाडी, एकलहरे,एकतास,शिरसाले, अटाले इत्यादी गांवात आ स्मिता वाघ यांच्या हस्ते विविध विकास कांमाचे भूमिपूजन आ स्मिता वाघ करण्यात आले. गलवाडे खु येथे 25/15 लेखाशीर्षा समाजिक सभागृह बांधकाम करने,झाडी येथे नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम करने,एकलहरे येथे शेष फंड अंतर्गत गांवदरवाजा बांधकाम …
मंगरूळ जि.प.प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनातून सामाजिक प्रबोधन..
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलामुलींनी स्नेहसमेलातून सामाजिक प्रबोधन करण्याचे संदेश दिले पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांनी शेतकरी आत्महत्या, देशभक्ती , वृक्षलागवड व संगोपन , स्त्री भृण हत्या , दारूबंदी , बेटी बचाव बेटी पढाव, सर्व धर्म समभाव , आदी विषयांवर नृत्य व नाट्य सादर …