सटोड्यांना सट्टा घेतांना पकडले अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील दोन जणांना शहरात चोरून लपून सट्टा घेतांना पकडले आणि त्यांच्याकडून ६ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने केली त्यात नारायण डिगंबर पाटील व प्रल्हाद संतोष पाटील हे चोरून लपून सट्टा घेतांना आढळून आल्याने त्यांना पकडण्यात आले …

सानेगुरुजी वाचनालया तर्फे ए.पी.जे कलाम यांच्या जयंती निमित्त अभिनव “वाचनध्यास” कार्यक्रम आयोजित…

अमळनेर( प्रतिनिधी)अमळनेर येथिल पू.सानेगुरुजी ग्रंथालय व मोफ़त वाचनालायतर्फे भारतरत्न दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त १५ ऑक्टोबर रोजी अभिनव “वाचनध्यास” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाचन ध्यास च्या माध्यमातून वाचकांना व श्रोत्यांना सुप्रसिद्ध पुस्तकावर आधारित अभिवाचन करण्याची आणि संबंधित पुस्तकावरील विविध मान्यवर साहित्यिक विचारवंतांची संदर्भपूर्ण चर्चा ऐकण्याची संधी …

झेप फाऊंडेशन च्या माध्यमातून रोजगाराभिमुख कोर्सेसला होतकरू विद्यार्थी व महिलांचा प्रचंड प्रतिसाद..

संस्थेकडूनच मिळतेय रोजगाराची हमी,अनेकांचा रोजगार सुरु,जास्तीत जास्त विद्यार्थी व महिलांनी लाभ घ्यावा-आ शिरीष चौधरी..अमळनेर(प्रतिनिधी) झेप फाऊंडेशन अंतर्गत JSWE च्या माध्यमातून शहरी भागातील सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत येणारे होतकरु विद्यार्थी व महिला वर्गास भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध रोजगाराभिमुख कोर्सेस चे प्रशिक्षण दिले जात आहे,विशेष म्हणजे या कोर्स नंतर संबधित संस्थाच …

बँकेतून पैसे लांबवणारा दुबे भामट्याच्या मध्यप्रदेश पोलिसांनी अमळनेरात आवळल्या मुसक्या…

बिहारी दुबे ने सुज्ञ लोकांना डुबवले…अमळनेर (प्रतिनिधी) देशातील आंतरराज्यात ठिकठिकाणी सराईतपणे सलगी वाढवून त्याच्याच बँक अकाऊंट मधील पैसे लांबवत गंडा घालणारा हा भामटा अमळनेर शहरात गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास होता यामुळे खळबळ उडाली आहे. अमळनेर येथील शिरुड नाका परिसरातील शिव कॉलनीत हा सुनील दुबे नामक वय ३० उत्तर प्रदेशातील मिर्झापुर येथील …