अमळनेरात रविवारी भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन.

आ.सौ स्मिता वाघ यांच्या निधीतून शासनमान्य ग्रंथालयांना मिळणार विपुल ग्रंथसंपदा,ग्रंथालय वैभव संपन्न करण्याचा प्रयत्न…अमळनेर-शहरात भव्य ग्रंथ वितरण सोहळ्याचे आयोजन उद्या रविवार दि १४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आले असून या सोहळ्यात आमदार सौ. स्मिताताई उदय वाघ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत अमळनेर मतदार संघ व अमळनेर …

म्हसले ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा,सरपंचपदी रविंद्र पाटील विराजमान…

अमळनेर(प्रतिनिधी)-अमळनेर तालुक्यातील म्हसले ग्रामपंचायती वर भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व सिद्ध करीत सरपंचपदी भाजपाचेच रविंद्र अर्जुन पाटील यांची निवड झाली आहे.सदर निवडीबद्दल आ सौ स्मिता वाघ व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते नूतन सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस हिरालाल पाटील तसेच ग्रा प सदस्य भरत पाटील,वना …

अमळनेर आगाराचे चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.!

सुरक्षा रक्षकाचे विद्यार्थ्यांशी गैरवर्तन…अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर एस.टी.आगारात नादुरुस्त एस.टी.बसेस व चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थायचे शैक्षणिक नुकसान होत असून ११ रोजी कावपिंप्री येथील विद्यार्थ्यांचे १२ वि चे पेपर बुडाले व सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याने अ.भा.वि.प. संघटनेने आगार प्रमुखांना निवेदन देऊन एस.टी. बसेस ची सुविधा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अंचाळे मुक्कामी …

सरस्वती विद्या शाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती सभा संपन्न..

अमळनेर(प्रतिनिधी)येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती सभा नुकतीच संपन्न झाली.आरोग्य परिचारिका सौ.प्रतिभा पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले तर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रणजित शिंदे हे उपस्थित होते. भारत सरकारने २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले असून नोव्हेंबर २०१८ …

दरोडा गुन्ह्यातील फरार आरोपी अमळनेर पोलिसांच्या जाळयात…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले होते त्यातील फरार आरोपी इम्रान बेलदार यालाही पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने तीन अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात रवाना केले आहे. आमिन एजाज खाटीक वय २० रा. पिंपळे रोड व तीन अल्पवयीन मुले, राकेश वसंत …

नवऱ्याने बायकोच्या संमतीशिवाय अनैसर्गिक संभोग केला..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील एका विवाहित महिलेने पतीने संमतीशिवाय अनैसर्गिक संभोग केला व इतरांनी विनयभंग केला आणि जमीन घेण्यासाठी ३ लाख मागितल्याच्या कारणावरून सुरत उदनायार्ड मदनपुरा अंबिकानगर मधील एकूण ६ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमळनेर शहरातील एका ३२ वर्षीय महिलेचा विवाह दीपक शिवाजी पाटील याच्याशी झाला होता २६ एप्रिल …

आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न..

बांभोरी कॉलेज विजेता, तर प्रताप कॉलेज उपविजेता..अमलनेर(प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव अन्तर्गत एंरडोल क्रीड़ा विभाग द्वारा आयो- जित आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा प्रताप कॉलेजच्या क्रीडांगणात काल ११/१०/२०१८ रोजी संपन्न झाले. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्या डॉ. ज्योती राणे मॅडम यांनी केले.या प्रसंगी मा.जितेन्द्र जैन (कार्यपाध्यक्ष,खा.शी.मंडळ),प्रा.डॉ. ए. बी.जैन(चिटणीस),मा.योगेशजी मुंदडा संचालक,प्रदीप अग्रवाल(संचालक),मा.डॉ …

अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध…!

जनसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी भविष्यात तिव्र आंदोलन छेडणार-अमोल माळी.अमळनेर(प्रतिनिधी)-महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशाने अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने ताडेपुरा येथील कृष्णा पेट्रोलियम वर पेट्रोल डिझेल दरवाढीचा विविध घोषणा देऊन निषेध करण्यात आला.व जी एस टी अंतर्गत समावेश करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या साडेचार वर्षापासून केंद्रात व राज्यात भा.ज.पा सरकार आहे. …