अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील मौजे धुपी खेड्यागावात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात दोन शाळकरी चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी धुपी येथे घडली. याबाबत असे की,सौरभ प्रमोद पाटील वय ८,जयेश रवींद्र पाटील वय अडीच वर्ष हे गावातील आपल्या घरा बाहेर आज दुपारी खेळत असतांना गावातील भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले.यात सौरभच्या …
मारहाण प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आठ जणांना सुनावली १ वर्ष कैदेची शिक्षा..
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाने शुक्रवारी मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील येथील दोन भावात जैतपीर येथे प्रॉपर्टीच्या हिस्सा बाबतीत १८/६/२०१२ रोजी किरकोळ स्वरूपात वाद झाला होता.त्यामुळे संतापलेल्या केशव चा भाऊ पंडित देवराज यांनी १९ रोजी नातेवाईकांना गावी बोलावत भांडण केले. यात …
अमळनेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी हर्षल पाटील तर शहराध्यक्षपदी पुनश्च विश्वास (बाळू) पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी हर्षल भटू पाटील तर शहराध्यक्षपदी विश्वास संतोष पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. नूतन पदाधिकार्यांनी संघटनेची बांधणी उत्तमरीत्या करून सर्व स्तरातील युवकांना राष्ट्रवादीशी जोडावे व प्रत्येक गाव तसेच शहरातील प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी युवकची शाखा स्थापन करावी अशी भावना या निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा …
देवगांव देवळी हायस्कूल मध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा.
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतीराव फुले हायस्कूल मध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक एस.के.महाजन,एच.ओ.माळी उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले.शाळेतील तिस विदयार्थीनी …
अमळनेर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत पेपर लेस..
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील पहिली आणि जळगाव जिल्ह्यातील तिसरी पेपरलेस ग्रामपंचायत पडासदळे ता. अमळनेर १ ते ३३ नमुना पेपर लेस करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद जळगाव, श्री संदीप वायाळ साहेब गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती अमळनेर, विस्तार अधिकारी चिंचोरे साहेब व राणे साहेब विस्तार अधिकारी ( ग्रा.पं ) …
महिला बचत गटातर्फे शुद्ध गावराणी तुपातील मोदक विक्री शुभारंभ..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर गणेश पर्वात येणाऱ्या नागरिकांना स्वस्त दर्जेदार आणि रुचकर प्रसाद मिळावा तसेच स्त्रियांना रोजगार मिळून त्यांच्या आर्थिक विकासाची चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी अमळनेर महिला मंचाने मोदक विक्रीचा शुभारंभ करून बचत गटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे. येथील डॉ राहुल मुठे यांच्या निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता या शुध्द …