विजय नाना पाटील आर्मी स्कूलच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे दिले आश्वासन 

लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे यांच्याशी भेट घेऊन केली समस्यांवर चर्चा  अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी दाखल घेऊन लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. …

अमळगांव येथील आदर्श विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन दिल्या उज्वल करिअरच्या शुभेच्छा 

सुरेश पिरन पाटील यांना “प्रगतीशील किसान पुरस्कार ” मिळाल्याने विशेष सत्कार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथील आदर्श विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन उज्वल करिअरच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गुणगौरव सोहळा झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील उपस्थित होते. …

अंगणवाडीत मुलांना चित्रकला साहित्य वाटप करून अस्मिता ग्रुप मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अस्मिता ग्रुपतर्फे  गांधळीपुरा येथील २ अंगणवाडीमध्ये ५५ -६० छोट्या मुलांना चित्रकला साहित्यचे वाटप करण्यात आले. त्यात वेगवेगळे चित्र रंगवण्यासाठीची पुस्तिका आणि रंगपेटी देण्यात आली. यामुळे या मुलांच्या चेहर्‍यावर हसू फुलवले. नवे साहित्य मिळाल्याने ते हरखून गेले. दरवर्षी अस्मिता ग्रुप अमळनेरतर्फे नगरपालिका शाळामध्ये शालेय साहित्य वाटप केले जाते. …

 आपत्ती व्यवस्थापन करण्याचे काम आता ग्रामसेवकांना देखील सोपविणार ; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवरसिंह रावत यांनी कार्यशाळेत दिली माहिती

तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी ; आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न  अमळनेर (प्रतिनिधी) तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थानाची जबाबदारी  ग्रामसेवकांनादेखील देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसेवकांना देखील स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवरसिंह रावत यांनी दिली. अमळनेर येथील पंचायत समितीच्या …

जळोद गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या आणि विविध स्पर्धेतील गुणवंतांचा केला गौरव

ग्रामपंचायतीच्या विधायक उपक्रमाने पुन्हा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची व्यक्त केली भावना अमळनेर (प्रतिनिधी)विविध क्षेत्रात कार्यरत आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या तसेच विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा जळोद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाने पुन्हा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केल्या. प्राथमिक शाळेच्या पटांगणावर भव्य …

महसुली कराकडे दुर्लक्ष करणार्‍या इंडक्स कंपनीचे २ मोबाईल टॉवर सील करून तहसीलदारांचा दणका

अमळनेर (प्रतिनिधी) महसुली कराकडे दुर्लक्ष करणार्‍या इंडक्स कंपनीचे २ मोबाईल टॉवर सील करून तहसीलदारांनी चांगलाच दणका दिला आहे. आले आहेत. तर अमळनेर तालुक्यातील विविध मालमत्ता धारकांकडे महसूल कराची अडीच कोटी थकबाकी असून याकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अमळनेर तालुक्यातून एकूण साडे तीन कोटी महसूल कर अपेक्षित असताना …

दहिवद येथील खंडेराव मंदिर देवस्थान परिसराचा तिर्थक्षेत्र आणि पर्यटन म्हणून विकास साधणार

खासदार उन्मेष पाटील यांनी खंडेराव महाराज देवस्थान यात्रेस भेट ग्रामस्थांना दिले आश्वासन अमळनेर (प्रतिनिधी) दहिवद येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले  खंडेराव मंदिर देवस्थान परिसराचा तिर्थक्षेत्र व पर्यटनविकास निधीचा प्रस्ताव तयार करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. खासदार पाटील यांनी दहिवद ता. अमळनेर येथील खंडेराव महाराज देवस्थान …

मुख्याध्यापक संजय भगवान पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

कोल्हापूरच्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे औरंगाबाद येथे पुरस्कार वितरण अमळनेर (प्रतिनिधी) कोल्हापूरच्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे अमळनेर तालुक्यातील मठगव्हान नालखेडा शाळेतील मुख्याध्यापक संजय भगवान पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.       गव्हर्नमेंट ऑफ आसाम टुरिझमचे संचालक डॉ. हृदय …

अमळनेरला १६ फेब्रुवारीला रंगणार अहिराणी, मराठी हास्य कवी संमेलन

शेती मातीच्या, राजकीय, सामाजिक, प्रेमावरील हास्य विडंबनात्मक कवितांचा अनोखा उत्सव अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात १६ फेब्रुवारी रोजी “प्रेमाचा जांगड गुत्ता” फेम नारायण पुरी, दंभस्फोटक कवी भरत दौंडकर यांच्या उपस्थितीत अहिराणी, मराठी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे रविवारची सायंकाळ ही अमळनेरकरांसाठी हस्स्याची ठरणार आहे. शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) व खान्देश …

शासकीय योजनांसाठी होणारी फरपट थांबवण्यासाठी २० फेब्रुवारीपासून उपोषण

अमळनेर तालुका सरपंच संघटनेने प्रातांधिकाऱ्यांना दिला निवेदनाद्वारे इशारा अमळनेर (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,  खरीप २०१९ दष्काळ अनुदान निधी योजना, प्रत्येक गावात स्वतंत्र कॅम्प लावणे बाबत. अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर न पडणे बाबत व शेतकऱ्यांची होणारी फरपड, आर्थिक नुकसान, पिळवणक थांबण्यासाठी अमळनेर तालुका सरपंच संघटनेने २० फेब्रुवारीपासून उपोषणास बसण्याचा …