ग्रामपंचायत आणि नगरपालिकाच शाळांना पुरवणार कोरोना साहित्य

जिल्हाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राने शाळांची चिंता मिटली अमळनेर (प्रतिनिधी)  इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची रोज तपासणी करण्यासाठी  सर्व साहित्य स्थानिक प्रशासन ग्रामीण आणि शहरी यांनी उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी आणि …

अमळनेर तालुक्यातील मठगव्हाणची सूनबाई ठरली मिसेस इंडिया उपविजेती

सर्व राज्यातून ७० स्पर्धकांमधून शीतल पवार यांनी प्रत्येक फेरीत घेतली आघाडी अमळनेर (प्रतिनिधी)सनराईझ व्हिजन एन्टरटेन्मेंटतर्फे आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत मालपूर येथील माहेर तसेच मठगव्हाण येथील सासर असलेल्या शीतल पवार यांनी मिसेस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. यामुळे सौंदर्य क्षेत्रात देखील अमळनेर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सनराईझ व्हिजन …

संगीताच्या दुनियेत टाकरखेडा येथील युवकाने प्रथम येत वाजवला डंका

आशिया खंडातील ११ हजार स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून खान्देशाचे नाव केले उज्ज्वल अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील युवकाने वरळी येथील सुप्रसिद्ध इंडिया फिल्म प्रोजेक्ट या कंपनीने  घेतलेल्या स्पर्धेत अवघ्या ५० तासात गाणे लिहून ,संगीतकारकडून संगीतबद्ध करून गायकामार्फत गावून आशिया खंडातील 11 हजार स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून खान्देशाचे नाव संगीत क्षेत्रात उज्ज्वल केले …

तब्बल महिनाभर मृत्यूशी झुंज देत यमालाही हरवून ‘जयवंत’ आज परतोय आपल्या घरी

फोटोग्राफर जयवंत ढवळे (JD) यांच्या जीवनात घडली एखाद्या चित्रपटा सारखी घटना अमळनेर (प्रतिनिधी)सर्वांच्याच दुःखावर आपल्या विनोदी स्वभावाने हास्य फुलणारा आणि स्माईल म्हणत आठवणींचा अल्बम तयार करणारा फोटोग्राफर जेडी ऊर्फ जयवंत ढवळे गेल्या तब्बल एक महिन्यापासून डोक्याला मार लागल्याने मृत्यूशी झुंज देत होता. सुरवातीला डॉक्टरांनीही आशा सोडली होती.. मित्रांनीही श्रद्धांजली वाहिली …

…. अखेर रुग्ण नसल्याने प्रताप कॉलेज मधील कोवीड केअर सेंटर तात्पुरते बंद !

सुरुवातीपासूनच अमळनेर शहरात कोरोनाने सर्वांनाच केले होते “डरोना” अमळनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात सुरुवातीपासूनच अमळनेर शहरात कोरोनाने सर्वांनाच “डरोना” करून सोडले होते. रोज वाढणार्‍या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने प्रत्येकाला धडकी भरत होती. तरीही प्रत्येक जण लढा देत होते. आजही देत आहेत. त्यात शुक्रवारी अखेर रुग्ण नसल्यामुळे प्रताप कॉलेजमधील कोवीड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात …

देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा मिळाला दर्जा : भारती पाटील

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मार्गदर्शक तत्वे जाहीर,  राज्य सरकारला अंमलबजावणीचे दिले आदेश अमळनेर (प्रतिनिधी) देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनौपचारिक कामगारांचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कामगारांच्या  योजनांसह अन्य सोयीसुविधांचा लाभ मिळावा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत, अशी माहिती आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती …

अमळनेरचा शेतकरी भूमिपुत्र जीवाची पर्वा न करता कोरोना लसीच्या ट्रायल चाचणीसाठी सरसावला

१८७ दिवस डॉक्टरांची टिम करतेय “विजय” वर अभ्यास, देवाच्या कृपेने अजून सुरक्षित राष्ट्रीय कार्यात सहभागाचा आनंद असल्याच्या खबरीलालशी बोलताना व्यक्त केल्या भावना अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने लाखो लोकांची जीव घेतला आहे…मग त्याचा जीव घेण्यासाठी लसीच्या संशोधनाकरीता देशाचे संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहे… तर मानवावर या लसीच्या चाचणीचा प्रयोग करताना काहीही बरेवाईट …

जनता कर्फ्यूच्या रात्री चोरट्यांनी टेलर आणि घड्याळाचे दुकान फोडून साधली चोरीची वेळ

दोन्ही दुकानातून चोरट्यांनी 17 हजार 500 रुपयांचा माल लंपास करून केला पोबारा अमळनेर (प्रतिनिधी) दुचाकी चोरी पाठोपाठ आता घरे आणि दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. त्यात जनता कर्फ्यूच्या सोमवारी रात्री जुने बसस्टँड जवळील आठवडे बाजारातील टेलर आणि घड्याळाचे असे दोन दुकाने फोडून चोरट्यांनी 17 हजार 500 रुपयांचा माल लंपास …

‘खबरीलाल’च्या बातम्यांची उचलेगिरी करणाऱ्या कॉपी पेस्ट मित्रांनो सावधान !

डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडंट पोर्टल्स, ‘खबरीलाल’कडून ‘कॉपी राईट’चा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यात ‘खबरीलाल’ न्यूज पोर्टलने आपल्या बातम्यांनी खास वेगळेपण जपत पत्रकारितेत आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मित्रांकडूनच ‘खबरीलाल’च्या बातम्यांची उचलेगिरी करायला सुरुवात केली आहे. ऐवढेच नव्हे तर असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अँड इंडिपेंडंट …

११९ ग्रामपंचायतींसाठी वनविभागाकडून ८५ हजार १५० वृक्ष लागवड करण्यासाठी मागवले

जिप शाळांची कसर ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीतून पूर्ण होणार : संदीप वायाळ अमळनेर (प्रतिनिधी)एक लक्ष वृक्ष लागवडीत अमळनेर व पारोळा तालुक्याच्या जिप शाळांमध्ये  ५० टक्क्यांपेक्षा कमी उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे  ११९ ग्रामपंचायतींसाठी  ८५ हजार १५० वृक्ष लागवड करण्यासाठी एक ते दीड वर्षे वयाची झाडे वनविभागाकडून मागवली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी …