अमळनेर मतदार संघातील युवक मंत्री अनिल दादांच्या विजयासाठी सरसावले : शिवाजी राजपूत

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघातील युवकांनी महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केल्याचे भाजयुमो ते तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी सांगितले.   मतदार संघातील युवकांनी महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून  महायुतीच्या नेत्या खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, भाजयुमोच्या नेत्या भैरवी वाघ पलांडे तसेच महायुतीचे सर्व …

अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरींना प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठींबा

अमळनेर (प्रतिनिधी)  विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार  शिरीष चौधरी यांना प्रहार जनशक्ती पक्षाने पाठींबा जाहीर केला आहे. अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी २०२४ मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने आपला अधिकृत पाठिंबा अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर केला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्रुटीमुळे फेटाळल्याने, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आणि …

डॉ. अनिल शिंदे यांना मतदारसंघातील युवकांची खंबीर साथ ः महेश पाटील

अमळनेर (प्रतिनिधी)  महाराष्ट्रासह देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावर युवकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिल्याने युवकांचा उमेदवार डॉ. शिंदे यांना खंबीर पाठींबा मिळत आहे, असे मत युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी व्यक्त केले आहे.  महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास विविध कल्याणकारी …

विकाच्या मुद्द्यावर कासार समाज पंच मंडळाचा मंत्री अनिल पाटलांना पाठिंबा

अमळनेर (प्रतिनिधी) विकासाच्या मुद्द्यावर श्री सो.क्ष. कासार समाज पंच मंडळ आणि संपूर्ण समाजाने महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना बीनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात लेखी पत्र त्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यामुळे अनिल पाटील यांच्या विजयासाठी मोठा पाठींबा मिळाला आहे.      विकासाच्या मुद्द्यावर आमचा संपूर्ण समाज अनिल पाटील …

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळग्रह मंदिरात रंगला तुलसी विवाह

अमळनेर (प्रतिनिधी) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त  १५ रोजी श्री मंगळग्रह मंदिरात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री तुलसी विवाह महासोहळा विधिवतरीत्या व अत्यंत जल्लोषात साजरा झाला. प्रारंभी वर राजा भगवान श्रीविष्णू व वधुराणी माता श्री तुलसी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती विराजमान असलेला रथ तसेच श्री मंगळदेव ग्रहाची उत्सवमूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत – गाजत  …

पोलिस आणि आयटीबीटी पथकाचे शहरातून शक्तिप्रदर्शन करीत पथसंचलन

अमळनेर (प्रतिनिधी)  पोलीस आणि आयटीबीटी पथकाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनातून भीती दूर होण्यासाठी शक्ती प्रदर्शन करीत शहरातून संयुक्त रूट मार्च काढला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली. अमळनेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीसचे निरीक्षक हयातसिंग यांच्या नेतृत्वाखाली  शस्रधारी पोलिसांसह रूट मार्च पाच कंदील, …

सूतगिरणीचा घोटाळ्यात चौधरी बंधूंची बसली दातखिळी; आता थेट मतदार पाठवणार घरी

माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी लगावला टोला   अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेकरांच्या डोळ्यात धुळपेक करीत उपऱ्या चौधरी बंधूचा सुतगिरणीचा महाघोटाळा मंत्री अनिल पाटील यांनी चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच दातखिळी बसली आहे. त्यांना त्यावर उत्तर देण्यासाठी काहीच नसल्याने त्यांना आता जनता नंदुरबराला कायमचेच घरी पाठवणार आहे, त्यामुळे त्यांनी बोळाविस्तार बांधून …

मंगळग्रह मंदिरात रंगला हळद, संगीत संध्याचा कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित श्री तुलसी विवाह महासोहळ्याच्या पूर्वसंध्येला १४ रोजी संध्याकाळी मंगळ ग्रह मंदिरात हळदी व संगीतसंध्या कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     यावेळी स्वाती महाले, विशाखा चौधरी, स्वाती चौधरी, योगिता साबळे, प्रियंका पवार यांनी श्री विष्णूजी …

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदेंच्या प्रचारार्थ आज सभा

सुप्रसिद्ध सिनेअभिनेते किरण माने यांची उपस्थिती   अमळनेर (प्रतिनिधी)  महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदेंच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध सिनेअभिनेते किरण माने यांच्या उपस्थितीत दि. १७ रोजी एक जाहीर सभा आयोजित केली जात आहे. या सभेचे आयोजन सायंकाळी ५ वाजता सानेगुरुजी विद्यामंदिर, धुळे रोड येथे करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित …

भूमिपुत्र म्हणनारे अनिल पाटील यांचे स्वस्वार्थ हाच परमार्थ असल्याचे सूत्र

कृ ऊ बा समितीचे माजी सभापती प्रफुल्ल पाटील यांचा आरोप   अमळनेर (प्रतिनिधी) आपले स्वयंघोषित भूमिपुत्र म्हणारे अनिल पाटील यांचे एकच स्वस्वार्थ हाच परमार्थ असल्याचे सूत्र आहे, असा आरोप त्यांचे दोन दशकांचे साथीदार आणि साक्षिदार राहिलेले प्रफुल्ल पाटील यांनी केला. त्यांचे अनुभव कार्यकर्ते आणि जनतेच्या डोळे उघडणारे असेच आहेत. प्रफुल्ल …