विधानसभा निवडणुकित ११ मॉडेल मतदान केंद्रांचे विशेष सुशोभीकरण

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात ११ मतदान केंद्राचे मॉडर्न मतदान केंद्र म्हणून निवड केली आहे.  लोकसभेच्या निवडणुकीत आधार संस्था आणि विप्रोने तीन मतदान केंद्र  सुशोभीकरण कार्य उत्कृष्टपणे पार पाडली होती. आताही त्यांनीच पुढाकर घेतला आहे.  निवडणूक  आयोगाच्या निर्देशानुसार  २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. अमळनेर विधानसभा क्षेत्रातील या विधानसभा …

साने गुरुजी, जी. एस. हायस्कूलतर्फे शहरातून रॅली काढून मतदान जागृती

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळांतर्फे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. यात नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यात सानेगुरूजी विद्यामंदीर  जी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. साने गुरुजी विद्यालयातर्फे सोमवारी मतदान जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीकशी करावी, आपले पालक आणि …

बचत गटाच्या महिला भगिनींनी मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा केला निर्धार

अमळनेर (प्रतिनिधी) बचत गटाच्या महिला भगिनींनी भूमिपुत्र अनिल दादा पाटील यांनाच विजयी करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती बचत गटाच्या प्रमुख नूतन विलास पाटील यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारक असून आम्ही का प्रचार करू नये, आम्ही सीआरपी (समूह संसाधन व्यक्ती ) म्हणून …

हिम्मत होती तर मतदार संघात एकतरी सभा घेतली असती ः रवींद्र चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी) महिला मेळाव्यात राणा भीमदेवी थाटात राजकीय वल्गना करणाऱ्या स्वंयघोषीत बेगडी भूमिपुत्राची बालिशासारखीच गत  झाली आहे. त्याच्यात एवढी हिम्मत होती तर मग त्याने निवडणुकीच्या कालावधीत एकतरी जाहीर सभा घेऊन दाखवायला पाहिजे होती, अशी निर्भत्सना डॉ. रवींद्र चौधरी यांनी केली आहे. स्वकर्तृत्वाच्या, स्वपराक्रमाच्या घोषणांनी आकाशपाताळ दणाणून टाकणारा स्वयंघोषीत भूमिपुत्र विधानसभा …

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आदित्य ताकमारे याने पटकावले सुवर्णपदक

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील निंभोरा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्था अमळनेर नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेतील आदित्य तानाजी ताकमारे याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे. गोरखपूर उत्तरप्रदेश येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाली. यात आदित्य याने  उत्तर प्रदेशच्या समीरवर एकतर्फी मात करत १०-० ने विजय …

प्रचारतोफा थंडावणार, बाहेरून आलेल्यानो आता मतदारसंघ सोडा!

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये प्रशासनाने दिले आदेश   मतदानासाठी प्रशासन सज्ज, आज १८१३  कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली माहिती   अमळनेर (प्रतिनिधी)  प्रशासनाने अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या २० रोजी होणाऱ्या मतदानाची जय्यत तयारी केली आहे. १९ रोजी टाकरखेडा रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात …

निवडणुकीत अपूर्ण पाडळसरे धरण व अस्तित्वातच नसलेली सूतगिरणी ठरली कळीचा मुद्दा

अमळनेर (प्रतिनिधी)  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमळनेर तालुक्यात 27 वर्षापासूनचा अपूर्ण पाडळसरे धरण व अस्तित्वातच नसलेली सूतगिरणी हे प्रचारात कळीचे मुद्दे ठरले. यामुळे अमळनेरकर जनता भावी आमदार कोण याचा कौल ठरणार आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मतदारसंघातील गावागावात व गल्लीबोळात सर्व उमेदवाराचा प्रचार दौरा निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत …

“एकीकडे बदमाश आहेत तर दुसरीकडे बाणेदार!”

डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांचा हल्लाबोल   अमळनेर (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी“एकीकडे बदमाश आहेत तर दुसरीकडे बाणेदार!” या वाक्याने सभेची सुरुवात करताच जोरदार टाळ्या टाळ्यांचा कडकडात झाला. आणि त्यांनी सभा जिंकली… …

भरधाव चारचाकिने दोन सख्ख्या बहिणींना धडक दिल्याने एकीचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोण फाट्यावर बसची वाट पाहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव येणाऱ्या चारचाकिने धडक दिल्याने एकीचा मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी दुपारी घडली आहे. तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, १७ रोजी दुपारी ३:३० वाजेच्या दरम्यान लोण बु. येथे मामाकडे आलेल्या तमन्ना सिद्धार्थ भालेराव …

कोरोना काळात अनिल दादांनी हजारो रुग्णांना प्राणवायू देऊन दिले जीवनदान : पुष्पा पाटील

सर्व लाडक्या बहिणी लाडका भाऊ अनिलदादा सोबतच उभ्या   ….नाही तर सूतगिरणीत 18 ऐवजी 90 कोटी केले असते लंपास.!   अमळनेर (प्रतिनिधी) भूमिपुत्र नामदार अनिल दादा पाटील यांनी कोरोना काळात ऑक्सिजन तथा प्राणवायुची पुरेशी व्यवस्था केल्याने आमच्या बहिणींचे पती, मुले,  आईवडील किंवा नातेवाईक असतील हे सारे वाचल्याने माझ्या सर्व लाडक्या …