अमळनेर (प्रतिनिधी) लग्नाच्या दोन दिवस आधी वधू रोशनी राजेंद्र भवसार हिने आपल्या आई ज्योती राजेंद्र भावसार आणि वडील राजेंद्र भावसार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. कर्तव्यपालनाचा संदेश देत मतदान हा लोकशाहीचा कणा आहे, हे दाखवून दिले. अमळनेर येथील भावसार कुटुंबातील रोशनीचा विवाह २२ नोव्हेंबर रोजी ठरलेला असून, लग्नाच्या तयारीची धावपळ असतानाही …
नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याने चेहऱ्यावरील आनंद गगणात मावेना
अमळनेर (प्रतिनिधी) पहिल्यांदाच मतदान करणार असल्याने दडपणसह, उत्सुकता नवमतदारांमध्ये होती. मात्र मतदान केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगणात मावत नव्हता. देशहीत आणि जनतेच्या उज्जवल भविष्यासाठी राष्ट्रीय कर्तव्य बजावणे किती महत्वाचे आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वतः मतदान करुन इतरांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन त्यांनी नवमतदारांनी केले. अमळनेर विधानसभा …
अमळनेर विधानसभा मतदार संघात 65.61 टक्के मतदान, तिन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा
अमळनेर विधानसभा मतदार संघात “एम” फॅक्टर जोरात अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात 65.61 टक्के मतदान झाले. मतदारमंध्ये उत्साह असला तरी सायंकाळी लक्ष्मी दर्शनानंतर मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. पाच मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने यंत्र बदलण्यात आले. तर मतदार संघात एम फॅक्टर जोरात राहिला. दरम्यान तिन्ही उमेदवारांनी विजयाचा …
गजरे परिवाराने लग्नात आहेर म्हणून भेट दिली भारतीय संविधानाची प्रत
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ताडेपुरातील गजरे परिवाराने मुलाच्या लग्नात इतर आहेर व्यतिरिक्त लग्नात आलेल्या मंडळींना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन एक नवीन संदेश दिला आहे. या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात चि.हेमंत व चिसौका साक्षी यांचा विवाह नुकताच थाटामाटात झाला. या विवाहात आपण आपल्या मुलाच्या लग्नात काही …
विप्रोने अमळनेर विधानसभा मतदार संघात 350 मतदान केंद्रांवर दिले प्रकाशदिवे
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात विप्रो कंपनी मार्फत आणि आधार संस्थेच्या सहयोगाने सीएसआर फंडातून इलेक्ट्रिक चार्जिंग बल्ब देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमळनेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार …
लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे
प्रशासनासह आजी, माजी लोकप्रतिनिधी यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) लोकशाही मजबूत आणि अमळनेर मतदारसंघाचे भविष्य उज्वल करण्यासाठी आज प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनासह आजी, माजी लोकप्रतिनिधी यांनी केले आहे. गेल्या महिन्याभरापासून अमळनेर मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडाला. त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान करण्याची वेळ आली आहे. लोकशाही मजबूत …
सात्री गावाला पूल नसल्याने कर्मचारी आणि ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ !
अमळनेर (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे पुलासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्यातील सात्री गावात मतदानासाठी अखेर प्रशासनालाही निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ आली. आणि मध्येच बैलगाडी अडकल्याने सात्रीकरांच्या समस्येची जाणीव प्रशासनालाही येऊन गेली. तालुक्यातील सात्री येथे अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न …
‘हॅलो मी उमेदवार बोलतोय….’ या रेकॉर्डेड कॉलने अमळनेरचे मतदार आता वैतागले
मतदारसंघा बाहेरील उमेदवारांचा कॉल-द्वारे अमळनेरात प्रचाराच्या सपाट्याने नागरिक हैराण अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर उमेदवारांनी चांगलाच भर दिला होता. मात्र आता मतदार संघासह बाहेरील मतदार संघातील उमेदवार रेकॉर्डेड कॉल करून ‘हॅलो मी उमेदवार बोलतोय’, मलाच मतदान करा’ असे कॉल येऊन मतदारांची रात्री अपरात्री चांगलीच झोप उडवली जात …
गैरसमजूतीतून तिघांनी दांपत्याला लाकडी दांडक्याने केली मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) गैरसमजूतीतून तिघांनी एका दांपत्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वासरे येथे १७ रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसानी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला व तिचे पती यांचे किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. त्यावेळी घराबाहेरून जाणाऱ्या शंकर रघुनाथ पाटील यांना वाटले की, …
मुडी मांडळ गटाने शिरीष चौधरींच्या पाठीमागे राहण्याचाच केला संकल्प
डॉ. दिपक पाटील, डॉ. चेतन ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास अमळनेर (प्रतिनिधी) विकासकामे अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी अमळनेर मतदारसंघाचा शाश्वत विकासाचा चेहरा असलेल्या शिरीष चौधरी यांच्याशिवाय पर्याय नाही. असा विश्वास पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. दिपक पाटील, डॉ. चेतन ठाकरे यांनी सभेत व्यक्त केला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार …