अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथे श्री.रामदेवबाबा ग्रुप, झामी चौक, अमळनेरतर्फे गोगाजी नवमी उत्सव आज रविवारी सायंकाळी – ४.३० वा. साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने माजी सैनिकांचा सत्कार ही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव महापालिकेचे माजी महापैर ललीत कोल्हे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार उन्मेश पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता उदय वाघ, अंधेरी टायगर ग्रुपचे सुयोग माने हजर राहणार आहेत. गोगानवमी निमित्त झामी चौक, पवन चौक, बालेमिया मज्जीद, सुभाष चौक,आंबेडकर पुतळयापर्यंत मिरवणुक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत ढोल, लेझीम व ट्रॅक्टरवर सजावट करण्यात येणार असून सर्वांना हजर राहण्याचे आव्हान मेहतर समाजाचे अध्यक्ष विक्की जाधव यांनी केले आहे.