पद्मावती मुंदडा विद्यालयात दहीहंडीचा जल्लोष, राधा आणि कृष्ण ही अवतरले

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथील स्व.सौ .पद्मावती मुंदडा विद्यालयात कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहिहंडी सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रदिप चौधरी यांनी कृष्ण जन्माष्टमी व भगवान श्रीकृष्णाचे अवतारकार्य याविषयी माहिती दिली. तर स्वाती पाटील यांनी भगवान विष्णूचे दशावतारच्या अवतारांविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक पी.एस.विंचूरकर यांनी यावेळी सुरेख गवळणी गायन करुण विद्यार्थांचा उत्साह वाढविला लहान गटातील विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधाची वेशभूषा साकारली होती. तसेच इतर विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी काठीने दहिहंडी फोडण्याचे तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी थर लावून हंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. उपक्रमशिल शिक्षक प्रदिप चौधरी सरांनी सपत्निक दहिहंडीचे पूजन केले. या नंतर अतिशय उत्साहाने हा सोहळा संपन्न झाला, लहान गटात इ.8वी चा विद्यार्थी राज पाटिल या गोविंदाने हंडी फोडली तर मोठ्या गटात इ.10 वी च्या संघाने थर लावून हंडी फोडली. अल्तमश शहा हा हंडी फोडून गोविंदाचा मानकरी ठरला. यावेळी विजयी गोविंदाला आणि संघाला मुख्याध्यापक पी.एस.विंचूरकर, जेष्ठ शिक्षक बोरसे सर, प्रदिप चौधरी, गोकुळ पाटील, स्वाती पाटील, किर्तीसोनार, वंदना पाटील, प्रकाश पाटील, राहूल पाटील, सागर महाजन, शिक्षकेतर कर्मचारी दिपक बागुल, रूपाली महाजन, राहूल अरूण पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात एन.टी.मुंदडा माध्य. विद्यालय, स्व.एम.एस.मुंदडा माध्य.विद्यालय आणि श्रीमती इंदिरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *