कृषिभूषण दादांच्या जनादेशाने स्मिता वाघांना ‘बळ’ इतर इच्छुकांना काढावा लागेल ‘पळ’…..

अमळनेर (खबरीलाल) अमळनेर मतदार संघातील भाजपकडून उमेदवारी मिळण्यास आमदार स्मिता वाघ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात सांगितल्यानंतर त्यांनी कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांना अमळनेर मतदार संघातील उमेदवारीचा जनादेश विचारला. आपसूकच साहेबराव दादांचा जनादेश स्मिता वाघांना ‘बळ’ देणारा असल्याने इतर इच्छुकांना पळ काढावा लागणार आहे, असे मतदारांमध्ये बोलले जात आहे.

होय, तुमचाच खबरीलाल…लेखनीचं व्यासपीठ…
एक पाऊल पुढे, रोज बातम्यांसाठी रहा अपडेट..!

https://www.khabrilalnews.online/p/blog-page.html

खबरीलाल व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन होण्याकरीता वरील लिंक क्लीक करा आणि २४ तास अपडेट बातम्या मिळवा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेच्या पूर्व तयारीसाठी संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेतून ते प्रत्येक मतदार संघातील भाजपकडून उमेदवारी मिळण्यास कोण लायक आहे, याची चाचपणी करीत आहेत. त्यामुळे ही महाजनादेश यात्रा मुख्यमंत्र्यांसह अमळनेर मतदार संघात भाजपाचा उमेदवार कोण, असेल याचाही जनादेश घेणारी होती. म्हणून या यात्रेकडे इच्छाकानसह जनतेचे लक्ष लागून होते. तर सध्या अमळनेर मतदार संघातून विद्यमान आमदार शिरीष चौधरी, विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील आणि निवृत्त पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील हे भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन विद्यमान आमदार, एक माजी आमदार आणि एक आयपीएस अधिकारी अशी चौकटी तिकिटासाठी उभी राहिली आहे. ही चौकट भेदणेही मुख्यमंत्र्यांनाही कठीण होते. कारण हे चारही दिग्गज आपापल्या परीने मिळेल तसे शक्ती प्रदर्शन प्रत्येकवेळी करीत आहे. मात्र तिकीट एक आणि इच्छुक चार जण असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या हुशारीने आमदार स्मिता वाघ आणि आमदार शिरीष चौधरी यांना जनादेश आहे का, आसा जनतेकडून कौल घेतला. पण याच वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कानमंत्र दिल्याने त्यांनी कृषिभूषण माजी आमदार साहेबराव दादांना जनादेश आहे का, असे जाहीर पणे विचारले आणि येथेच आमदार स्मिता वाघ यांच्यावर शिक्कामोर्तब झाला. कारण कृषिभूषण माजी आमदार साहेबराव दादा आणि आमदार शिरीष चौधरी यांच्यात विस्तव ही जात नाही. आमदार शिरीष चौधरी यांनी कृषिभूषण साहेबराव दादांविरोध विखारी प्रचार केल्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. म्हणुनच त्यांनी आमदार चौधरी यांच्या “सुत” विरोधात “दूध” संघ स्थापन करून सर्व पक्षीय मोट बांधली आहे. त्यामूळे त्यांचा जनादेश हा आमदार स्मिता वाघ यांनाच असल्याचे सर्व श्रुत आहे. म्हणून आमदार शिरीष चौधरी यांना भाजपाच्या तिकिटापासून लांबच रहावे लागले. त्यामुळे त्यांनी पुन्हा अपक्ष उमेदवारी केल्यास त्यांच्या विरोधात सर्व पक्षीय मोट आमदार स्मिता वाघ यांना निवडून आणण्यासाठी मजबुतपणे उभी राहील. आणि इतरांना माघारी आपला घरचा रस्ता धरावा लागेल. त्यामुळे कृषिभूषण साहेबराव दादा यांना उमेदवारी मिळाली नाही तरी तेच “किंग मेकर” ठरणार आहेत.

‘शेजारीनला लुगडे आणि घरचे उघडे’

महाजनादेश यात्रेची तायरीची संपूर्ण जबाबदारी आमदार स्मिता वाघ यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी दिवसरात्र एक करीत या यात्रेसाठी मेहन घेतली. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांची फळीही मोठी होती. त्या चांगल्याच ‘पॉवर फुल’ असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून सुटले नाही. तसेच लोकसभेचे तिकीट कापल्यानंतर ही त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करीत आहेत. त्यामुळे केवळ सहयोग सदस्य म्हणून आमदार शिरीष चौधरी यांचा तिकिटासाठी विचार होईल हे आता पर्यंतच्या राजकीय घडामोडी वरुण दिसत नाही. समजा त्यांना तिकीट दिल्यास ‘शेजारीनला लुगडे आणि घरचे उघडे’ अशी गत होऊन जनताही भाजपला उघडे करेल, असे मतदारांमध्ये बोलले जात आहे.

सहयोगी आमदाराच्या थाटापुढे पक्षाचेच खासदार पडले थिटे….

भाजपकडून दोनदा उमेदवारी करून खासदार राहिलेले ए.टी. पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महा जनादेश यात्रेला दांडी मारली.
तर नव्याने निवडून आलेले खासदार उन्मेष पाटील यांनी निवडून आल्यानंतर पाडळसे धरणाची माती आपल्या कपाळी लावून अमळनेरकरांचे आभार मानले. मात्र त्यानंतर ते गायब झाल्यावर मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेला आले. पण यातही ते मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे होते. तर सहयोगी आमदार चौधरी पुढे होते. त्यामुळे सहयोगी आमदाराच्या थाटापुढे भाजप पक्षाचे खासदार कसे थिटे पडले, असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

मुख्यमंत्री सोबत येण्याचा लागटपणा….

मुख्यमंत्री यांची महाजनादेश पारोळा येथून निघत असताना एक नामांकित व्हाइट कॉलर पुढाऱ्याला मुख्यमंत्र्यांसमवेत यायचे होते. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या गाडीत चढायला लागले. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना हटकले. मी दमदार असल्याचे त्यांना सांगावे लागले. ही बाब महाजनादेश यात्रेचे प्रमुख यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दमदार यांना नंतर मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत घेतल्याचे भाजपच्याच गोटातील विश्वसनीय निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

कौल जनतेचा – विधानसभा २०१९ महा-सर्वेक्षण
आढावा अमळनेर मतदारसंघाचा……
आपणच खरे लोकशाहीचे शिलेदार, आपणच निवडू आपला पसंतीचा आमदार…
मग,चला, उठा आपल्या हक्काचा आमदार निवडण्यासाठी येथे क्लिक करा….????????
http://aamdar.in/vote-your-mla/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *