अमळनेर (खबरीलाल) सावकारी विरोधी कायदा झाला असला तरी आजही अमळनेर शहरात खासगी सावकाऱ्यांनी समाजातील गरजूंना हेरून त्यांच्या भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. व्याजाने अव्वाच्या सव्वा भावाने पैसे देऊन सतत अशा गरजूंच्या मागे लागून वसुलीसाठी तगादा लावतात. आधीच बेरोजगारी, हातउसनावारी, घर संसार, वाढती माहागाई, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चात गुरफटून पिचलेले असतानाच अशा लुटारू सावकाऱ्यांच्या ससेमिराने माणूस अधिकच खचून. धाकदपटशाहीचा उपयोग करून पैशांसाठी कर्जदाराला बेजार करून बळी देणाऱ्या बोकडा सारखे हलाल करता. त्यांच्या या रोजरोजच्या जाचाला कंटाळून मरण यातना सहन करण्यापेक्षा या पैशांसाठी हफापलेल्या आणि छळवादी दुनियाचा त्याग करून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. जितेंद्र महाजनही याच सावकारी पाशाच्या व्यवस्थेचे बळी असून अशा प्रकारे अनेकजण आजही या सावकारी पाशातून मुक्तहोण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे या सावकारांच्या नांग्या वेळीच ठेचल्या तरच अनेक कुटुंब उदध्वस्त होण्यापासून वाचतील. अन्यथा पुन्हा समाजातून जितेंद्रची कहानी जन्म घेईल…….!
जितेंद्रच्या चित्तरकथेने समाजमन झाले सुन्न…..
म्हातारी आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असे भरलेले घर आणि संसार असतानाही बेरोजगारी आणि कर्जामुळे जितेंद्र महाजन याने आपले जीवन संपवले. मृत्यूला कवटाळ्यापूर्वी माझ्यानंतर म्हातारी आई, पत्नी, मुली, मुलगा यांचे काय होईल, याचा विचार त्यांच्या मनालाही स्पर्शून गेल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या तीन पानी सुसाईड नोटवरून दिसते. तर या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या जीवनाची चित्तरकथाच मांडून सर्वांच हेलावून सोडले. ती लिहितांना त्यांना म्हातारी आई, पत्नी, मुली, मुलगा, मित्र, नातेवाईक आणि त्यांना मदत करणाऱ्यांची आवर्जून आठवन झाली. पण नैराश्याच्या गर्तेत आणि सावकारी पाशाच्या दलदलीत पुरता खोलात अडकून गेल्याने त्यांना मृत्यूच जवळचा वाटला आणि त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलत जगाचा निरोप घेतला. मुलाच्या खांद्यावर जाण्या एवजी मुलालाच खांदा द्यावा लागला.. भरल्या संसारातून सुहासिनीचे लेणं गेलं…बापाविना मुलं पोरकी झाली… समाज मन सुन्न झाले….हा सन्नाटा सर्वांच्याच काळजाला पाझर फोडून गेला….
जितेंद्र महाजन यांनी श्री साईनाथांना स्मरून सुसाईड नोट लिहिली. त्यांनी लिहलेली ही सुसाईड नोट म्हणजे त्यांच्या अपयशी जीवनाची कहाणी असली तरी त्यांनी सावकारी पाशाला कंटाळून आत्महत्या केल्याने वाचकांसाठी आम्ही ती जशीच्या तशी देत आहोत….
मी जितेंद्र चिमणराव महाजन अमळनेर लिहून देतो की, मी आज दिनांक २०/८/२०१९ मंगळवार रोजी आत्महत्या करीत आहे. यात माझ्या परिवाराचा व माझ्या संपूर्ण भाऊबंदकी, नातेवाईक, मित्र यांचा काहीही संबंध नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. यात कोणीही दोषी नाही. मी माझ्या जीवनात फारच अपयशी झालो. मला कुठल्याच क्षेत्रात काही प्रमाणात वाव मिळाला नाही. मला कुठल्याच प्रकारची नोकरी, कामधंदा, व्यवसायात यश मिळाले नाही. मी नेहमी अपयशाचाच सामाना केला. मला नेहमीच पैशांची अडचण भासत राहिली. त्यामुळे मी व्याजाचे पैसे घेत गेलो. काहींकडून उसणावारी ही केलेत. परंतु मी कर्ज सुद्धा काढले. परंतु माझ्याकडून कोणाचेही पैसे दिले गेले नाहीत. मला नातेवाईक, घरचे लोक, मित्र यांनी फारच सपोट दिला. परंतु मी त्यांच्या कसोटीवर खरा उतरू शकलो नाही. व्याजाच्या पैशांमुळे मी फारच कर्ज बाजारी झालो. त्यांचे पैसे देणे माझ्याकडून शक्य नव्हते. म्हणून मी आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. माझ्या निर्णयामुळे माझा परिवार फारच हातबल होईल. माझी म्हातारी आई आहे. पत्नी आहे. दोन मुली, एक मुलगा आहे. यांचे काय होईल. मला समजते परंतु माझ्यामुळे परिवारसुद्धा खूपच अडचणींना तोंड देत होते. माझ्याकडे कुणीच कुठलीच अपेक्षा केली नाही. मी त्यांचा गुन्हेगार आहे. मी चांगला मुलगा होऊ शकतो नाही. एक चांगला पती होऊ शकलो नाही. एक चांगला पिता होऊ शकतो नाही. एक चांगला भाऊ होऊ शकलो नाही. एक चांगला जावाई होऊ शकलो नाही. एक चांगला शालक होऊ शकलो नाही. एक चांगला मामा होऊ शकलो नाही. एक चांगला मित्र होऊ शकलो नाही. त्यामुळे मी या सर्वांची माफी मागतो. मी तुमचा गुन्हेगार आहे. मला माफी नाही. परंतु मी शेवटची माफी मागतो. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला फारच संकटांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे मी क्षमा मागतो. प्रतिभा माझ्या आईचा, मुलाचा तु व्यवस्थित सांभाळ करशील, अशी मी खात्री बाळगतो. तु माझ्या जाण्याने खचू नको. हिंमत धर व मुलांना चांगले शिक्षण, चांगले असेच संस्कार दे. त्यांना व्यवस्थित ठेव. माझे सासरे आबा मी तुमचा व सासूंचा (मालती मामींचा गुन्हेगार आहे.) माझ्या पत्नी व मुलांकडे चांगले लक्ष द्या. एवढी एकच विनंती करतो. मी तुम्हाला सांभाळायला होते, परंतु नियतीला ते मान्य नव्हते. श्रीमती ग.भा.कल्पना (स्मिता) वाहिणी मी तुमचा पण गुन्हेगार आहे. मला क्षमा करा व माझ्या मुलींकडे व मुलाकडे चांगले लक्ष द्या. तुम्ही त्यांना फार काही दिलं. यापुढेही असेच प्रेम, आदर माझ्या मुलांसाठी व माझ्या पत्नीसाठी ठेवा. त्यांना अंतर देऊ नका. तुम्ही अंतर देऊ शकत नाहीत, याची मला खात्री आहे. प्रतिभा तु व आई माझा आता विचार सोडून द्या व हिमतीने पुढे चला. मुले पुढे तुम्हाला चांगले दिवस आणतील. मानसी, श्रद्धा, अनुज यांची काळजी घ्या व स्वतःचीपण काळजी घ्या. मला क्षमा करा. मी तुमचा फारच विश्वासघात केला आहे. तो भरून काढणे कठीण आहे. अमोल दादा, बापू, संगीता ताई, बापू भाऊ, रंजना वहिणी माझ्या प्रतिभाची, मुलांची, आईची काळजी घ्या. त्यांना तुम्ही कधीच अंतर देऊ शकत नाहीत. याची मला खात्री आहे. मी तुम्हाला फार दुखः देऊन चाललो. मी तुमचा अपराधी आहे. मुलांचा अपराधी आहे. मला माफी नाही. माझे मामा, मामे भाऊ, मामी, मावशी, मावस भाऊ तुमचापण मी गुन्हेगार आहे. मला माफ करा, व प्रतिभा मुलांकडे, आईकडे व्यवस्थित लक्ष ठेवा, व त्यांना तुमच्या परिने जेवढे सांभाळता येईल, तेवढे सांभाळा, मला क्षमा करा. माझी मुलं. माझी श्रद्धा (वैष्णवी), अनुज (वेदांत) चांगले शिक्षण घ्या. चांगले माणसे बना, व खूप मोठे व्हा. माझा विचारही डोक्यात आणायचा नाही. तुम्ही खूप लहान आहात. आईला त्रास होईल, असे वागू नका, जशी परिस्थिती असेल, तसे वागा व खूप मोठे व्हा. मी सर्वात मोठा गुन्हेगार तुमचा आहे. मला क्षमा नाही. मी क्षमा मागतो. मी घेतलेल्या सर्व कर्जाचा, व्याजांच्या, उसणवारी पैशांचा माझ्या परिवाराचा काहीएक संबंध नाही. त्यांना कोणीही त्रास देऊ नये, मी ज्यांच्याकडून पैसे घेतलेत. मी आपली रक्कम फेडू शकलो नाही. त्याबद्दल आपली माफी मागतो. त्यांचा काही ठिकाणी माझ्या परिवाराच्या डुबलिकेट सह्या मी केल्या आहेत. त्यांच्याशी माझ्या परिवाराचा काहीएक संबंध नाही. पुन्हा मी आपणा सर्वांची माफी मागतो. अमळनेर पोलिसांनी माझ्या परिवाराचा सहानुभूती विचार करून त्यांना सपोट करावा.
आपला गुन्हेगार
जितेंद्र महाजन, श्रीराम कॉलनी (कर्जबाजारी) झाल्यामुळे
आत्महत्या