अमळनेर (प्रतिनिधी) येथिल अमळनेर आदिवासी ठाकूर समाजातर्फे विश्व आदिवासी दिवसाची नोंद न करणाऱ्या दिनदर्शिकांची होळी करण्यात आली.जागतिक आदिवासी दिवसाची दखल न घेणाऱ्या पंचांगकारांचा जाहिर निषेध करण्यात आला.
“महाराष्ट्रातिल एकूण लोकसंख्येच्या ९.३५% लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे.मात्र दिनदर्शिकांचे निर्माते जाणिवपूर्वक इतक्या मोठ्या जनसमुदायाच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची साधी नोंदही आपल्या दिनदर्शिकेतून घेत नाही.त्यावरून अश्या पंचांगकारांची आदिवासींना आजही अतिशूद्र मानण्याची जातीयवादी मानसिकता दिसून येते.अश्या पंचांगकारांचा आदिवासी ठाकूर समाजातर्फे जाहिर निषेध करण्यात येत असल्याचे”, असे महाराष्ट्र आदिवासी ठाकूर सेवा मंडळाचे राज्य सरचिटणीस रणजित शिंदे यांनी सांगितले.
अमळनेर येथिल त्रिकोणी बगिचा चौकात कालनिर्णय, भाग्योदय या कॅलेंडर ची होळी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर ,सचिव प्रकाश वाघ,उपाध्यक्ष संजय ठाकूर,कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर,महिला अध्यक्षा सौ.मिनाबाई ठाकूर,महिला कार्याध्यक्षा अपेक्षा पवार
,सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकूर,शांताराम धोंडू ठाकूर, प्रकाश वानखेडे,सौ.बेबीबाई वानखेडे आदिंनी कालनिर्णय, भाग्योदय यासह इतर दिनदर्शिकांची होळी करून आदिवासी ठाकूर समाजाच्यावतीने जाहीर निषेध नोंदविला.जननायक बिरसा मुंडा की जय’,’विश्व आदिवासी दिवसाचा विजय असो!’,’जातीयवादी मानसिकता असलेल्या पंचांगकारांचा निषेध असो!” अश्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून सोडला.
आदिवासी एकता परिषदतर्फे दिनदर्शिकेची केली होळी….
या प्रसंगी ज्या दिनदर्शिकां मध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उल्लेख नाही अश्या कालनिर्णय, भाग्योदय,उदयप्रकाश इ कॅलेंडर ची होळी करण्यात आली.
आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री साळुंके,आदिवासी एकता परिषद जिल्हाध्यक्ष आनंद पवार,तालुकाध्यक्ष रमेश भिल,सदस्य बाळू भिल,सदस्य शामराव भिल,सुनील भिल,तुकाराम भिल,देवा भिल,आदिवासी युवा शक्तीचे महेंद्र पवार,सुनील रमेश भिल,तसेच आदिवासी लोकनृत्य कला पथक ढोल पावरी व आदिवासी कलाकार उपस्थित होते