पांझरा नदीच्या पुराने ओलांडली धोक्याची पातळी, अमळनेर तालुक्यातील गावांना सर्तकतेचा इशारा..

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीच्या उमगमस्थानावर रविवारी जोरदार पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणात मोठ्याप्रमाणावर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे पाणी पांझरा नदीत सोडण्यात आल्याने पांझरा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. ही नदी अमळनेर तालुक्यातील काही गांवामधून जात असल्याने या नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून तालुका प्रशासन आपत्कालीन परिस्थीती शी तोंड देण्यास सज्ज झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणात पाण्याचा मोठा साठा झाल्याने रविवारी या धरणातून पांझरा नदी पात्रात रात्री वेळ ९.३० वाजता २२,००० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हा पाण्याच विसर्ग ४०,००० क्यूसेस पर्यंत जाणार आहे. त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहत आहे. धुळे शहरातील गणपती पुलावरून सुमारे दोन मीटर एवढ्या उंचीवरून पाणी वाहत असल्याने पुढे अमळनेर तालुक्यातील बेटावद, कपिलेश्वर आणि मुडी या पुलावरूही तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहण्याची शक्यता आहे. तसेच पुराचे पाणी हे नदी काठावरील गावांमध्ये शिरून जीवित आणि वित्त हाणी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. तसेच कपिलेश्वर येथील संगमावर पांझरेचा प्रवाह मिळेल, तेव्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन काही गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यती प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे या गावातील नदीच्या पुलांवरून नागरिकांनी वाहतूक अथाव पायी चालणे टाळावे. नागरिकांनी कोणीही धोका न पत्करता पोलिसांना,महसूल प्रशासनाला सहकार्य करून स्वतःसह कुटुंब आणि गावाच्या रक्षणासाठी तत्पर रहावे, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे आणि प्रांत सीमा अहिरे यांनी केले आहे.

बोदर्डे ग्रामपंचायतीला पाण्याचा वेढा…

मुडी येथील कळंबु रस्त्यावर आलेले पाणी
बोदर्डे ग्रामपंचायतीला पाण्याचा वेढा
बोदर्डे येथील ५० कुटुंब जिल्हा परिषदत शाळेत स्थलांतर केले आहे. पांझरा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांना सर्तकेचा इशारा दिला आहे. बोडर्डे येथे गावात पाणी शिरल्याने येथील आदिवासी वस्तीला जिल्हा परिषद शाळेत हलवण्याचे काम प्रांत अधिकारी  सीमा आहिरे,तहसिलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. तसेच ग्रामस्थांनी स्वतःसह कुटूंबाची आणि ग्रामस्थांची काळजी घेऊन नदी काठावर न जाण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *