काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करून उत्तरप्रदेशातील योगी सरकारकडून मुस्कटदाबी

अमळनेर ग्रामीण कॉंग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन केला निषेध

अमळनेर (प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील सोनभद्र हिंचार घटना ही संघटीत गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजप सरकरच्या काळात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते. यात पीडित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची योगी सरकारकडून मुस्कटदाबी केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना झालेली अटक ही असेच दर्शवत आहे. म्हणूनच केंद्र शासन आणि भाजपशाशित राज्ये विरोधी पक्षांच्या अधिकारात सर्रास गदा आणत आहेत. त्यामुळे गांधी यांच्या अटकेचा आणि अन्यायपूर्ण लोकशाही विरोधी कारवाईचा तसेच केंद्र व उत्तरप्रदेश राज्य सरकारचा अमळनेर तालुका ग्रामीण आणि शहर कॉंग्रेस कमिटीने निषेध व्यक्त केला असून यासंदर्भात नायब तहसीलदार बी.डी.ढिवरे,यांना निवेदन दिले.
निवेदन देताना काँग्रेसचे अमळनेर शहराध्यक्ष मनोज पाटील, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, विधानसभा क्षेत्रप्रमुख शांताराम पाटील, माजी सभापती संदीप पाटील, बुथ प्रमुख प्रमोद पाटील, प्रवीण जैन, ज्येष्ठ कार्यकर्ते लोटन पाटील, शालिग्राम पाटील, शहर सचिव नागेश स्वामी, अहमद खॉ मुनील खॉ पठाण, भागवत सूर्यवंशी, राजू शेख हाजी अल्लाउद्दीन, अल्पसंख्यांक आघाडीचे अ.अलिम मुजावर वसंत रावण पाटील,प्रशांत पाटील, सईद तेली, सुरेश पाटील, दाबीर पठाण लोटन चौधरी,आदी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या हिंचारारात १० जण ठार तर बरेज नागरिक जखमी झाले होते. या घटनेतील पीडितांना रुग्णालयात जाऊन कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी विचारपूस केली. त्यानंतर त्या सोनभद्रा येथे पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सरकारच्या सूचनेवरून प्रशासनाने त्यांना नारायणपूर येथे रोखून पुढे जाण्यास मनाई केली. तसेच त्यांना ताब्यातही घेतले.या करावाईच्या निषेधार्थ प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठाण मांडून धरणे धरून पोलिस आणि योगी सरकारचा निषेधही केला.
राजकीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांना हिंसाचार पीडितांना भेटण्यापासून कोणत्या कायद्यान्वये योगी शासन रोखत आहे? लोकप्रतिनिधींना जर अशी वागणूक मिळत असेल तर उत्तरप्रदेशात खरच काय कायद्याचे राज्य आहे काय? , असाही प्रश्न अमळनेर शहर आणि ग्रामीणच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच योगी आदित्यानाथ शासन आपल्या हाती असलेल्या अधिकाराचा मनमानी गैरवापर करीत असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ही लोकशाहीची मुस्कटदाबी आहे. हिंसाचार पीडीतांची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन उत्तरप्रदेश शासन किती असुरक्षित वातावरण निर्माण करीत आहे, हे या घटनेवरून दिसून येते. विरोधी पक्ष नेत्यांच्या अधिकाराची उघडपणे पायमल्ली होताना दिसत आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश राज्य शासन व केंद्र शासन झालेल्या घटनेबारत मौन बाळगुन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उत्तरप्रदेशातून लोकप्रतिनिधी झाले आहेत. म्हणून या अन्यायपूर्ण लोकशाही विरोधी कारवाईचा तसेच केंद्र व उत्तरप्रदेश राज्य सरकारचा तालुका ग्रामीण आणि शहर कॉंग्रेस कमिटी निषेध व्यक्त करीत आहे, असेही निवेदनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *