सुमारे ४ कोटी निधीतून होणार ७ किमी लांबीचा रस्ता,आदिवासी सभागृहाचेही भूमिपूजन

अमळनेर( प्रतिनिधी)मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेळावे, चिखलोद बु ते चिखलोद तांडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे भूमीपूजन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.अमळनेर मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील शेळावे येथे अतिशय थाटात हा सोहळा पार पडला.यावेळी ७ लाख निधीतून मंजूर झालेल्या आदिवासी सभागृह, दलित वस्तीत काँक्रीट रस्ता व चिखली नदीवर बंधारा आदी विकासकामांचे भूमिपूजन आ चौधरींच्या हस्ते करण्यात आले.
४ कोटी २ लाख ९७ हजार निधीतून रस्त्याचे काम होणार असून एकूण ६.९०० किमी लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे,गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत असताना आ चौधरी यांनी यशस्वी पाठपुरावा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठा निधी मंजुर केला,त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.या रस्त्यात १३ पाईप मोऱ्या असून १०० मिटर काँक्रीट रोड होणार आहे,व्हेटेंड पेव्हडीप १ मग असून ४०० मिटर ची सरंक्षण भिंत असणार आहे.
या कामाचा भूमिपूजन सोहळा अतिशय भव्य स्वरूपात शेळावे येथे संपन्न झाला,आ चौधरी यांचे गावात आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच गावात डी जे लावून आमदारांचा जयघोष करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी शेळावे सरपंच सरपंच किरण पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की चिखली नदीचे हिरा उद्योग समूहाच्या निधींतून खोलीकरण करण्यात आल्याने गाव विहीरिंची पाणी पातळी वाढून दुष्काळ असतांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही असे सांगून आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.तर मोहाडी सरपंच रामचंद्र पाटील यांनी याआधी अमळनेर मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील या ४२ गावांना आधी कोणीही वाली नव्हते, कोणीही विकास काम करत नव्हते, परंतु आमदार शिरीष चौधरी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर या भागातील गावांचा विकास करून विकासाचा रथ सुसाट ठेवल्याची भावना व्यक्त केली.
याप्रसंगी दगडी सबगव्हान सरपंच नंदलाल पाटील, खेडीढोक सरपंच चांगदेव पाटील, मोहाडी सरपंच रामचंद्र पाटील, उपअभियंता राजेंद्र ढाके, कनिष्ठ अभियंता विवेक पाटील, मा सरपंच राजेंद्र पाटील, किरण गोसावी, आबु महाजन, सतीश पाटील, पुंडलिक पाटील, गंगाधर पाटील, गंगाराम पाटील, धर्मा पाटील, निवृत्ती पाटील, नारायण पाटील, अशोक पाटील, भगवान कोळी, आमदार शिरीषदादा मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.