आ.सौ.स्मिता वाघ यांचा सवाल,प्रत्येक ठिकाणी फुकटचे श्रेय घेणारे तुम्हीच…
दुष्काळात होरपळनाऱ्या जनतेस वाऱ्यावर सोडल्याचा आरोप
अमळनेर(प्रतिनिधी) आधुनिक युगात रस्त्यांचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर रस्त्यांची दरजोन्नतीची कामे जोमाने सुरू आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हायब्रिड अम्युनिटी तत्वानुसार राज्यात रस्त्याची कामे सुरु आहेत.प्रवासात कोठेही जाताना सर्वत्र सुरू असलेली कामे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अमळनेर मतदार संघातही याच पद्धतीने केंद्रीय तसेच राज्याच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू असताना याचे विनाकारण श्रेय घेणाऱ्या स्थानिक आ.शिरीष चौधरी यांचा संबंध काय?असा सवाल आ. सौ., स्मिता वाघ यांनी उपस्थित करत अमळनेर मतदार संघातील जनता दुष्काळात होरपळत असताना कोणत्याही उपाययोजना न राबविता जनतेस वाऱ्यावर सोडल्याचा आरोप देखील आ सौ वाघ यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ स्मिता वाघ यांनी म्हटले आहे की फुकटचे श्रेय घेणारे आम्ही मुळीच नसून याउलट आ चौधरी यांनीच सुरवातीपासून आयते श्रेय घेण्याची परंपरा सुरू केली आहे,नुकतेच त्यानी धुळे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले,वास्तविक गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य शासनाच्या हायब्रीड अम्युनिटी तत्वाअंतर्गत धुळे(फागने फाटा) ते अमलनेर,चोपड़ा मार्गाच्या दरजोन्नतीचे काम सुरू असून आता अमळनेर हद्दीत काम सुरू झाले आहे पुढे हेच काम पुढे चोपड्यापर्यंत होणार आहे, व ह्या मार्गवारिल रेल्वे उडानपुलाचे कांम केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधि अंतर्गत करण्यात येत आहे तसेच महामार्ग सहा ते मुसळी फाटा,धरणगाव अमळनेर,बेटावद यांचेही काम याच पद्धतीने होत आहेत,याचे टेंडर पाहिल्यास अमळनेर शी याचा काहीही संबध नसून केवळ अमळनेर हद्दीतून हे मार्ग जात आहेत एवढाच संबध आहे,बेटावद नंतर नरडाणा, शिंदेखेडा,याचे कागदपत्र आपल्याकडे असून यासाठी तत्कालीन पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ही कामे होत आहेत,विधान परिषद आमदार या नात्याने आपण या रस्त्यांची मागणी लावून धरली होती.तसेच दोंडाईचा व नंदुरबार पर्यंत या मार्गाचे काम सुरू असून थेट गुजरात ला हा मार्ग जोडला जात आहे,यावरून हे रस्ते निर्माण करण्यामागे ना गडकरी व ना फडनवीस यांचे मोठे ध्येय असून रस्त्यांचे जाळे निर्माण करून भारत जोडण्यासाठी देशाच्या प्रगतीला गती देण्यासाठी ते निघाले आहे.यावरून स्थानिक आमदारांचा यात एक टक्का देखील संबध नाही हे स्पष्ट होत असून याचे संपूर्ण श्रेय ना गडकरी आणि ना फडणवीस व ना चंद्रकांत दादा पाटिल यांच्या माध्यमातून भाजपालाच आहे.
प्रत्येक ठिकाणी श्रेयवाद
यासंदर्भात अधिक माहिती देताना आ सौ स्मिता वाघ यांनी म्हटले आहे की संत सखाराम महाराज संस्थानसाठी भक्त निवासाचे भूमिपूजन नुकतेच आ चौधरी यांनी केले,त्याच्याशी देखील यांचा संबंध नसून याच्या मंजुरीचे संपूर्ण कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत, अर्थ संकल्पात मंजूर झालेली रस्त्यांची कामे देखील आपलीच असून यांचा तेथेही काही संबध नाही,आमदार म्हणून ते इतर कामे मंजूर करून आणत असतीलही याबद्दल शंका नाही परंतु त्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या कामाचाच ते अधिक डंका पिटतात,याआधी कपिलेश्वर मंदिर येथे विकास कामासंदर्भात असाच श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, लवकी नाला,भाल्या नाला आदी काम देखील आपल्याच प्रयत्नातून मार्गी लागले असून याचा शुभारंभ धुळे जिल्हा हद्दीत झाला होता, विधान परिषद आमदार या नात्याने मी ते भूमिपूजन केले,मात्र यांना श्रेय मिळत नसल्याने यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती असा आरोप आ सौ वाघ यांनी केला आहे.तसेच माळण नदी पुनर्जीवित करण्याचा डीपीआर तयार झाला असून लवकरच ह्या कांमाच शुभारंभ होईल आमदार महोदयानी ह्या कांमाचे श्रेय घेण्यासाठी तयार रहावे असा सल्ला आ स्मिता वाघ यांनी दिला आहे.
दुष्काळात जवाबदारी घेण्यात अपयशी
दिल्लीचे रस्ते गल्लीचे सांगून श्रेय घेण्यापेक्षा स्थानिक आमदार म्हणून स्वतःच्या जवाबदाऱ्या यांनी ओळखल्या पाहिजेत.दुष्काळात पशु पालक अडचणीत असताना एकही चारा छावणी यांनी आणली नाही,राना वनात कुत्रीम पाणवठे आणले नाहीत,ग्रामिण भागात टँकर देण्यासाठी विशेष लक्ष घातले नाही,जनतेला टंचाईतून बाहेर काढण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत,आमदार झाल्यानंतर केवळ एक वर्ष ग्रामिण भागात टँकर अभियान राबवून राजकीय गाजावाजा केला त्यानंतर सतत चार वर्षांपासून दुष्काळ असतानाही यांचे टँकर कायमचे गायब झाले,नाला खोलीकरण साठीही एकदा सी आर फंडातून २५ लाख देऊन शासकीय निधीतून झालेल्या सर्व जलसंधारणाच्या कामांचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न केला.या सर्व बाबीतून यांचा खोटारडे पणाच सिद्ध झाला आहे.
निराधार योजनेतही पाठ थोपटण्याचा केविलवाणा प्रकार..
निराधार योजनेची २७०० प्रकरणे एकाच बैठकीत मंजूर केल्याचा दावा करत स्वतःची पाठ यांनी थोपटून घेतली मात्र एवढी प्रकरणे जमा होण्याची कारणे काय तर यांनी जवळपास सात ते आठ महिने मिटिंग च न घेतल्याने मोठया प्रमाणात प्रकरणे जमा झालीत.म्हणजेच एकप्रकारे निराधार लाभार्थ्याना लाभ मिळण्यास यांच्यामुळे उशीर झाला त्याला हे रेकॉर्ड समजत असतील तर अमळनेरकर जनतेचे हे दुर्देवच आहे,यांना वेळ नसेल तर यांनी तहसीलदार यांना अधिकार दिल्यास दरमहा नियमित बैठक होऊन वेळेवर लाभार्थ्यांना न्याय मिळू शकेल मात्र श्रेय घेण्याची मोठी हाऊस असणारे एवढे मोठे पण दाखविणार नाही असा टोला स्मिता वाघ यांनी शेवटी लगावला आहे.