अमळनेर – न्याक A++ दर्जा प्राप्त प्रताप महाविद्यालयात शाळा बाह्य लोकांना जिमखाना खुला करण्यात आला असून विद्यार्थी वाऱ्यावर सोडले आहेत
या बाबत तक्रार करून 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्या नंतर ‘आम्ही बाहेरील व्यक्तींकडून शुल्क आकारतो’ असे निर्लज्ज पणे सांगण्यात आले. चक्क महाविद्यालय प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांना 14 ऑगस्ट 18 रोजी दिलेल्या पत्रात असे मान्य केले आहे.,
विद्यार्थी महत्वाचे की संस्था चालक यांचे शिफारशींच्या जीवावर खेळणारे बाहेरील लोक? आजवर किती फी आकारण्यात आली? किती भाडे गोळा झाले? किती लोक येतात? त्यांची येण्याची जाण्याची वेळ काय?, विद्यापीठ अनुदान मंडळाने व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रताप ला असा धंदा करायला परवानगी दिली आहे का ?, जमा झालेले शुल्क कोणत्या खात्यात टाकण्यात येते? त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो..?, शुल्क कोण आकारतो..?, त्या साठी कोणती नियमावली ठरविण्यात आली आहे..? येणाऱ्या जाणाऱ्या वर नियंत्रण कोण करतो..?
शेकडो विद्यार्थिनी व विद्यार्थीचा वावर असलेल्या या महाविद्यालयात या बाहेरील भाडेकरू व्यक्ती पासून धोका नाही याची कोण व कशी काळजी घेतो? काही विपरीत घडल्यास कोण जबाबदार..? येणाऱ्या व्यक्ती यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का? त्यांचे कडून कोणते लेखी घेण्यात आले आहे का..? साहित्य तोड फोड होते त्याची भरपाई कोण करतो, विद्यार्थ्याना का खेळू दिले जात नाही, या सह अनेक मागण्या घेऊन धनंजय सोनार यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान मंडळ(UGC} , शिक्षण विभाग व राज्यपाल यांचे कडे दि. 22 ऑगष्ट तक्रार पाठविली आहे.
न्याक मानांकित महाविद्यालय विद्यार्थी हिता पेक्षा भाडोत्री लोकांना महत्व देते, ही लाजिरवाणी बाब असून सर्व सांबाबधितांवर कारवाई करून क्रीडा विभागाचे अनुदान थांबवावे अथवा सर दोषी व्यक्ती कडून वसूल करावे व विद्यार्थी मोकळे पणाने जिमखाना, मैदान वापरू व वावरू शकतील याची तजवीज करावी अशी मागणीही धनंजय सोनार यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.