धार मालपूर येथील महिलेला मारहाण, १० आरोपीं विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धार मालपूर येथील एका महिलेच्या घरा समोर २० मे रोजी बेकायदा जमाव जमवून जोरजोरात शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करीत असताना आरोपी बबलू युवराज पाटील याने हातातील काठीने फिर्यादीचे हातावर जबर मारहाण करून दुखापत केली व तुला जिवंत सोडणार नाहीत म्हणून जीवे मारण्याची धमकी देत गल्लीत आरडाओरडा करत माझे कुटुंबातील लोकांना धमकावले म्हणून फिर्याद दिली होती त्यानुसार मारवड पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र फिर्यादी महिला ही उपचार घेऊन परत काल १६ रोजी पोलिसांत आल्याने वरील घटना व फिर्यादी मथुराबाई विनायक पाटील वय ७८ राहणार मालपूर यांनी आरोपींच्या बाबतीत पुन्हा नवीन वाढीव तक्रारीवरून सायंकाळी निर्जलाबाई दिलभर पाटील,सुनंदा राजेंद्र पाटील,वंदना ज्ञानेश्वर पाटील,ज्ञानेश्वर लहू पाटील, युवराज राघो पाटील,बबलू युवराज पाटील,माधुरी बबलू पाटील,हिरालाल दिलभर पाटील,जयराम दिलभर पाटील,सुशीला युवराज पाटील या १० आरोपींविरोधात मारवड पोलीसात बेकायदा जमाव जमवून दंगल घडवून आणल्याचा गुन्ह्यासह विविध नऊ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक निलेश शेमळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *