अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मुंबई गल्लीतील न प दवाखान्यासमोरील प्रसन्ना प्रकाश शाह यांच्या घरात असलेल्या जैन डिगंबर समाजाच्या मंदिरातून चोरीस गेलेल्या देवाच्या धातूच्या पुरातन २ मुर्त्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धार्मिक मूर्त्यांमुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावला आहे.
प्रकाश शाह यांचे कुटुंब बाहेरगावी विवाह सोहळ्यासाठी गेले असताना चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून दिगंबर जैन मंदिराच्या तीन पुरातन मुर्त्या , रोख रक्कम व दागिने असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला होता त्यामुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता विशेष म्हणजे अमळनेरात डिगंबर जैन समाजाचे हे एकमेव स्थान असून देवाच्या अतिशय पुरातन मुर्त्या चोरट्यांनी लंपास केल्याने सर्व समाज बांधवांनी तीव्र भावना व्यक्त केली यामुळे याची गंभीर दखल पोलिसांनी लागलीच घेऊन घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे सहाय्यक पोलिस अधीक्षक अग्रवाल,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व जळगाव एलसीबी पथकाने भेट देऊन पाहणी केली.
अवघ्या सहा तासात पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी राजू शेख व अनिल सोनवणे या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवली मात्र आरोपी गुन्ह्याची कबुली देत नव्हता दुसरीकडे मंदिरातील पूजा बंद झाल्याने जैन बांधवांचा दबाव वाढला होता दोन वेळा मिळालेली पोलीस कोठडीची मुदत संपायला आली असतानाही चोरटे मुर्त्या द्यायला तयार नव्हते त्यांनी तीन चार वेळा दिशाभूल करून काही नावे सांगून पोलिसांचा तपासाचा मार्ग बदलण्याचा व वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला अखेर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी आपले कौशल्य पणाला लावून खबरी मार्फत माहिती काढून चोरट्याला खाक्या दाखवताच राजू शेख याने तांबेपुरा भागातील त्याच्या घरच्या बाजूला धाब्यावर दोन मुर्त्या फेकल्याचे कबुल केले पोलिसांनी मुर्त्या हस्तगत केल्यामुळे जैन बांधवांनी पोलीस निरीक्षक बडगुजर यांचे कौतुक केले.
शाह यांच्या घराचे पहील्या खोलीत समाजाचे डिगबर जैन मंदिर असल्याने समाजाचे लोक नियमित सकाळी देवदर्शनास येत असत. त्यात चंद्रप्रभु भगवान् यांची पंच धातुची मुर्ती शांतीनाथ भगवान यांची पंचधातुची मूर्ती , पाश्वनाथ भगवान यांची पंच धातूची मूर्ती असल्याने जैन बांधवांच्या धार्मिक व जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने या घटनेकडे समाजाचे लक्ष लागून होते दररोजचा धार्मिक विधी बंद पडला होता दोन मुर्त्या सापडल्याने जैन बांधवांनी आंनद व्यक्त केला आहे.
राजू शेख याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनवल्याने त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.